Turkey-Syria Earthquake: भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये 'ऑपरेशन दोस्त' चे कौतुक केले जात आहे. तुर्कस्तानमध्ये भारतीय लष्कराने ज्या प्रकारे तत्परतेने मदत उपलब्ध करुन दिली, ते पाहून सगळेच कौतुक करु लागले आहेत.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्कराने तुर्कीमध्ये सुमारे 3600 रुग्णांवर उपचार केले. त्यांनी पुढे सांगितले की, तुर्कस्तानचे नागरिक यासाठी मेसेज पाठवून कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
तुर्कस्तानच्या रुग्णांचे म्हणणे आहे की, भारतीय लष्कराने त्यांना अशा वेळी मदत केली, जेव्हा त्यांना खरोखरच गरज होती.
भारताचे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सांगितले की, तुर्कस्तानमध्ये केवळ सहा तासांच्या अल्प सूचनेवर रुग्णालय (Hospital) तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, 30 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. हा निर्णय वेळेत घेतल्याचे त्यांनी सांगितले. हे फील्ड हॉस्पिटल 14 दिवस चालले. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर तैनात करण्यात आले होते.
लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या 60 पॅरा फील्ड या वैद्यकीय पथकाचा सत्कार केला. तुर्कस्तानमध्ये मदत दिल्यानंतर चमू मायदेशी परतला आहे.
तुर्कस्तानमध्ये आलेल्या भीषण भूकंपात (Earthquake) हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, भारताने पुढे येत तुर्कीला मदत पाठवली आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके पाठवण्यात आली. यामध्ये एनडीआरएफच्या जवानांचे पथकही बचाव कार्यासाठी तुर्कीला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्कीहून परतलेल्या NDRF जवानांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.