कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोला जोडणारा एक गुप्त भूमिगत ड्रग-तस्करी भुयार सापडला आहे. हे भुयार 1,774 फूट लांब आहे. न्यूयॉर्कच्या फ्रीडम टॉवरच्या उंचीपेक्षा फक्त दोन फूट लहान असलेल्या या भुयारात रेल्वे ट्रॅक, वेंटिलेशन आणि वीज पुरवठा देखील आहे. (tunnel joining Mexico to California discoverd by police)
हे भुयार तिजुआना, मेक्सिकोमध्ये सुरू होतो आणि सॅन दिएगोच्या ओटे मेसा जिल्ह्यातील एका गोदामात संपते. गुन्हेगारी टोळीद्वारे वापरल्या जाणार्या घराची हेरगिरी करत असताना होमलँड सिक्युरिटीने या भुयाराचा शोध लावला. इथून सुमारे 77 कोटींचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले.
लुझ डी लूना ओल्मोस आणि व्हेनेसा रामिरेझ यांचा एजंटनी पाठलाग केला. एजंटनी गोदामातून बाहेर पडणाऱ्या त्यांच्या पाच कार थांबवल्या ज्यामध्ये 1,762 पाउंड ड्रग्ज होते. याचबरोबर
164 एलबीएस मेथॅम्फेटामाइन आणि 3 1/2 एलबीएस हेरॉइन देखील जप्त करण्यात आले.
यूएस ऍटर्नी रँडी ग्रॉसमन म्हणाले, ‘आम्ही आमच्या कुटुंबांच्या रक्षणार्थ सापडलेला प्रत्येक भूगर्भीय तस्करीचा मार्ग बंद करून टाकू.’
कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात 1993 पासून कमीतकमी 90 ड्रग भुयार सापडली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.