उत्तर अफगाणिस्तानातील बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ येथे गुरुवारी मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय लष्कराचे नागरी कर्मचारी असलेल्या जखमींना लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे, असे माध्यमांनी सांगितले आहे. (Big blast in Afghanistan three injured)
या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही
प्रांतीय पोलिस प्रवक्ते मोहम्मद आसिफ वजीरी यांनी सांगितले की, हा स्फोट सकाळी झाला होता. यावेळी नागरी कर्मचाऱ्यांच्या मिनी बसला टारगेट करण्यात आले होते. आतापर्यंत कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने याबाबत जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.
लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडून तालिबानने (Taliban) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानची (Afghanistan) सत्ता काबीज केली होती. अफगाणिस्तानमध्ये सध्या हिंसक घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इस्लामिक स्टेटने बहुतांश घटना घडवून आणल्याचा दावा यावेळी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.