Tunisia President Kais Saied Dainik Gomantak
ग्लोबल

Tunisia political crisis: राष्ट्राध्याक्षांनी संसद अन् पंतप्रधानांना केल बरखास्त

तसेच ट्यूनिशियन (Tunisia) जनतेकडून राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

दैनिक गोमन्तक

ट्यूनीशियाचे (Tunisia) अध्यक्ष कैस सईद (Kais Saied) यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे.तसेच नेहे हिचम मेचीचि (Hicham Mechichi) यांनाही पंतप्रधान पदावरुन पायउतार करण्यात आले आहे. ट्यूनियशियन विरोधी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे हा देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापी, राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, त्यांचा हा निर्णय घटनेअंतर्गत घेण्यात आला आहे. तसेच ट्यूनिशियन जनतेकडून राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आणि रस्त्यावर उतरुन आनंदही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष कॅस सय्यद यांनी रविवारी म्हटले की, नव्या पंतप्रधानांना सहायता करण्यासाठी कार्यकारी अधिकार ग्रहण करतील. 2014 मध्ये बनविण्यात आलेल्या ट्यूनिशियन संविधानाला हे सर्वात मोठे आव्हान आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संसद यांच्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले आहे.

सरकारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रध्यक्षांनी म्हटले की, पाखंड, विश्वासघात आणि ट्यूनिशियन नागरिकांच्या अधिकारांवर आक्रमण करण्यात आले होते. मी अशा सर्व नागरिकांना चेतावनी देतो की, जे लोक हत्यार उचलण्याची योजना बनवत होते. जो कोणी बंदूक चालवेल त्याला सशस्त्र बलही त्याचप्रकारे उत्तर देईल.

गेल्या वर्षापासून ट्युनिशियामध्ये हे राजकिय संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रध्यक्षांकडून उचलणयात आलेल्या पाऊलाचे प्रदर्शनकर्ते नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी देखील आह्वान करण्यात आले आहे. ट्यूनिशियामध्ये आर्थिक संकट जारी आहे. ट्यूनिशिायामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे18 हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT