TTP Attacks Pakistani Army Dainik Gomantak
ग्लोबल

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

10 Pakistani Soldiers Killed: लष्कराचे वाहन सीमावर्ती भागातून जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या 15 ते 20 टीटीपी दहशतवाद्यांनी पहिल्यांदा आयईडी स्फोट (IED Blast) घडवला.

Manish Jadhav

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्याच्या मिरयान तहसीलमध्ये शनिवारी सकाळी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर मोठा आणि अत्यंत नियोजनबद्ध हल्ला केला. या हल्ल्यात 10 पाकिस्तानी सैनिक मारले गेले, तर अनेक जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आयईडी स्फोट आणि गोळीबाराने हल्ला

दरम्यान, दहशतवाद्यांनी हा हल्ला अचानक केला. लष्कराचे वाहन सीमावर्ती भागातून जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या 15 ते 20 टीटीपी दहशतवाद्यांनी पहिल्यांदा आयईडी स्फोट (IED Blast) घडवला आणि त्यानंतर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. हल्ल्यात लष्कराचे एक वाहन पूर्णपणे नष्ट झाले.

इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने घटनेला दुजोरा दिला, परंतु नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये क्षतिग्रस्त वाहन दिसत आहे, जे हल्ल्याची तीव्रता दर्शवते. स्फोटाचा आवाज अनेक मैल दूरपर्यंत ऐकू आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत पसरली. हा हल्ला अफगाणिस्तान सीमेजवळ झाला आहे, जिथे टीटीपीची घुसखोरी सातत्याने वाढत आहे.

दहशतवादी कारवायांचा वाढता धोका

खैबर पख्तूनख्वा प्रांत गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी (Terrorist) हल्ल्यांचे मोठे केंद्र बनला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. 2025 मध्ये खैबर पख्तूनख्वामध्ये आतापर्यंत 605 हून अधिक दहशतवादी घटना नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यात लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांचा मोठा समावेश आहे. या हल्ल्याच्या अवघ्या एक दिवस आधी, टीटीपीने याच खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या एका चौकीवर कब्जा केला होता. त्यावेळी पाकिस्तानी सैनिक जीव वाचवण्यासाठी पळून गेले होते.

यापूर्वी, सप्टेंबरमध्ये वजीरिस्तानमध्ये झालेल्या अशाच एका हल्ल्यात 12 सैनिक शहीद झाले होते, तर बन्नूमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात फेडरल कॉन्स्टेब्युलरी मुख्यालय हल्ल्यात 6 जवान मारले गेले होते. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 नुसार, टीटीपीने गेल्या वर्षी 1,081 हून अधिक मृत्यू घडवून आणले होते.

अफगाणिस्तानला इशारा

या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कठोर शब्दांत सांगितले की, "दहशतवादाविरुद्धच्या युद्धात कोणतीही ढिलाई केली जाणार नाही."

यासोबतच त्यांनी अफगाणिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला. ते म्हणाले की, "अफगाणिस्तानने आपल्या जमीनीचा गैरवापर दहशतवादी कारवायांसाठी थांबवावा." पाकिस्तान (Pakistan) आपल्या नागरिकांच्या आणि सैन्याच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

या घटनेमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील सुरक्षा व्यवस्था आणि पाकिस्तानमधील दहशतवादाच्या वाढत्या धोक्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

World Introvert Day 2026: अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता 'अपोलो'सारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात..

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

SCROLL FOR NEXT