Sameer Amunekar
बहावलपूर जवळील हा विशाल किल्ला जैसलमेरच्या राजपूत राय जज्जा भाटी यांनी बांधला होता. ३० मीटर उंच भिंती आणि १५०० मीटर घेर असलेला हा किल्ला चोलिस्तान वाळवंटातूनही काही मैलांवरून दिसतो.
गिलगिट-बाल्टिस्तानमधील हुनझा खोऱ्यात स्थित हा सुमारे ९०० वर्ष जुना किल्ला मीर राजांच्या मालकीचा होता. नॉर्वे, जपान आणि आगा खान ट्रस्ट यांच्या सहकार्याने त्याचे पुनर्संचयन करण्यात आले.
शेरशाह सुरीने १५४० ते १५४७ दरम्यान झेलम जिल्ह्यात बांधलेला हा भव्य किल्ला १२ दरवाजे आणि ३०,००० कामगारांच्या श्रमांनी उभा राहिला. नंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला.
मुघल सम्राट अकबरने १५६० मध्ये बांधलेला हा किल्ला २० हेक्टर क्षेत्रफळात पसरलेला आहे. आलमगीर दरवाजा जहांगीरने १६१८ मध्ये बांधला. हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे.
सिंध प्रांतातील जमशोरो येथे असलेला हा जगातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. ३२ किलोमीटर लांबीमुळे त्याला “सिंधची भिंत” असेही म्हटले जाते.
राणीकोट किल्ल्याचे खरे बांधकामकर्ते कोण हे आजही निश्चित नाही. काही इतिहासकार ८३६ मध्ये इम्रान बिन मुसा बर्माकीने तो बांधल्याचे मानतात, तर काही २०व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ सांगतात.
हे सर्व किल्ले फाळणीपूर्वी भारताच्या इतिहासाचा भाग होते. फाळणीनंतर हे पाकिस्तानच्या भूभागात गेले, पण त्यांचा भारतीय वारसा आजही जिवंत आहे.