Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Mali: मध्य मालीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 9 ठार, 60 हून अधिक जखमी

Mali Blast: मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर या भीषण स्फोटात 60 हून अधिक लोक जखमी झाले.

Manish Jadhav

Mali Blast: मध्य मालीमध्ये शनिवारी आत्मघातकी हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर या भीषण स्फोटात 60 हून अधिक लोक जखमी झाले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या बॉम्बस्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा वाढू शकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

तसेच, सुदानची (Sudan) राजधानी खार्टूममध्ये रॅपिड सपोर्ट फोर्स आणि देशाच्या लष्करामध्ये अनेक दिवसांच्या तणावानंतर परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. देशभरात सातत्याने गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लष्कराच्या मुख्यालयाजवळ गेल्या अनेक तासांपासून गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

सुदानीज डॉक्टर्स युनियनच्या म्हणण्यानुसार, लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) यांच्यातील रक्तरंजित संघर्ष सुरु आहे.

गृहयुद्धासारखी परिस्थिती असताना सत्तापालट होण्याची शक्यता आहे.

सुदानमध्ये सत्तापालट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 30 हून अधिक लोक ठार झाले आहेत.

मृतांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. खार्टूमसह, ओमदुरमन, न्याला, एल ओबेद आणि एल फाशर या शहरांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. ही शहरे राजधानी खार्तूमच्या पश्चिमेस आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT