Traffic Rules
Traffic Rules Dainik Gomantak
ग्लोबल

Traffic Rules: गोव्यातच नाही तर 'या' देशातही दारू पिऊन गाडी चालवल्यास 2.4 लाखांचा दंड

दैनिक गोमन्तक

Drink and Drive Rules: भारत असो वा अन्य कोणताही देश, वाढत्या रस्ते अपघातांना लगाम घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. ड्रिंक अँड ड्राईव्हमधून वाहतुकीचे इतर नियम मोडल्यास दंड आकारण्याचीही तरतूद आहे. हे नियम आणि कायदे असूनही, त्याचा परिणाम भारतात दिसून येत नाही, परंतु एक असा देश आहे जिथे दारू पिऊन वाहन चालवणे इतके दंडनीय आहे की लोक कोणत्याही परिस्थितीत नियम तोडण्यास घाबरतात.

ब्रिटनमध्ये वाहतुकीचे नियम अतिशय कडक

ब्रिटनमध्ये अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुकीचे नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत. जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली आणि पकडले गेले तर तुरुंगात जावू शकता. इतकेच नाही तर मोठ्या दंडाशिवाय तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरही बंदी घातली जाऊ शकते. यूकेमध्ये रहदारीचे नियम मोडणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

Rehabilitation कोर्स करावा लागेल,

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या ड्रायव्हिंगवर यूकेमध्ये एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी असेल. मग तुम्ही ड्रिंक-ड्राइव्ह रिहॅबिलिटेशन कोर्स करून तुमचे निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.

मात्र, यावर अंतिम निर्णय न्यायालयाने घ्यायचा आहे. एकदा ड्रिंक आणि ड्राईव्ह प्रकरणात पकडले गेल्यास, 12 महिन्यांपर्यंत ड्रायव्हिंगवर बंदी घातली जाऊ शकते. त्याचबरोबर या प्रकरणात दहा वर्षांत दोनदा दोषी आढळल्यास तीन वर्षांसाठी वाहन चालविण्यास बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे.

2.41 लाख रुपयांचा दंड

ब्रिटन सरकारच्या वेबसाइटनुसार, देशात वाहन चालवण्यासाठी कायदेशीर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. किंवा 2.41 लाख रुपये (भारतीय चलन) दंड आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही जास्त दारू पिऊन गाडी चालवली किंवा वाहतूक कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले तर 3 ऐवजी तुम्ही 6 महिने तुरुंगात जाऊ शकता. या प्रकरणात अमर्यादित दंड देखील लावला जाऊ शकतो.

दारूच्या नशेत गाडी चालवताना, निष्काळजीपणामुळे मोठा अपघात झाला आणि चुकून कुणाचा मृत्यू झाला तर त्यामुळे अशा परिस्थितीत वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला 14 वर्षांचा तुरुंगवास, अमर्यादित दंड किंवा दोन वर्षांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर बंदी अशी शिक्षा होऊ शकते. पण ब्रिटनच्या तुलनेत भारताबद्दल बोलायचे झाले तर इथे रोज वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसेल. दंडाच्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास, वेगवेगळ्या शुल्कांमध्ये, यूकेच्या तुलनेत दंड 500 रुपयांपासून सुमारे 5000 रुपयांपर्यंत आहे.

मागील काही दिवसात गोव्यात अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असून प्यालेल्या अवस्थेत कुणी वाहन चालविताना आढळल्यास चालकाच्या विरोधात 'एफआयआर' दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिली. उद्या 2 ऑगस्ट पासून ही कारवाई सुरू होणार असे त्यांनी सांगितले. उद्यापासून गोव्यात दारू पिऊन वाहन चालविल्यास 6 महिने तुरुंगवास अन् 10 हजार दंड आकरण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT