TikTok Star Mahek Bukhari Dainik Gomantak
ग्लोबल

Titok Star: 21 वर्षीय प्रियकराचा ब्रेकअपला नकार; टिकटॉक स्टार लेकीच्या साथीने आईने घडवला अमानुष प्रकार

Ashutosh Masgaunde

TikTok Star Mahek Bukhari And Her Mother Ansreen Bukhari Found Guilty of Murder:

24 वर्षीय टिकटॉक स्टार महेक बुखारी आणि तिची आई अन्सरीन बुखारी यांना लंडनमध्ये (London) दोन तरुणांची अपघात घडवून हत्या केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

पीडित साकिब हुसेन आणि हाशिम इजाजुद्दीन (Saqib Hussain and Hashim Ijazuddin) या 21 वर्षीय तरुणांचा फेब्रुवारी 2022 मध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता. हा अपघात घडवण्यात बुखारी माई लेकीं मुख्य सुत्रधार होत्या.

महेक बुखारीची आई अन्सरीन बुखारी हिच्याशी असलेले प्रेमसंबंध उघड करण्याच्या हुसैनच्या धमक्यांना घाबरुन बुखारी माई लेकींनी दोघांची हत्या केली.

लीसेस्टर क्राउन कोर्टात तीन महिन्यांच्या खटल्यात 28 तासांच्या विचारविनिमयानंतर न्यायाधीशांनी हा निकाल दिला.

पीडित साकिब हुसेन आणि हाशिम इजाजुद्दीन.

खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले की महेक बुखारीने साकिब हुसैनला खोट्या बहाण्याने मिटींगसाठी आमंत्रित करून सापळा रचला.

महेक सहकारी आणि यातील आरोपी रेखा कारवान आणि रईस जमाल यांनी दोन वेगवेगळ्या कारने पीडितांच्या कारचा पाठलाग केला.

त्यानंतर या दोन्ही कारने पीडिताच्या कारला धडक (Car Accident) दिली. साकिब हुसेन आणि हाशिम इजाजुद्दीन ज्यामध्ये बसलेल्या कारमध्ये होत ती कार इतर दोन कारच्या धडकमुळे एका झाडावर आदळली आणि तिने पेट घेतला. त्यामुळे दोन्ही पीडितांचा मृत्यू झाला होता.

या हत्येप्रकरणी सात जणांना दोषी ठरवण्यात आले आहे

कारमध्ये समोरच्या सीटवर बसलेल्या साकिब हुसैन यांने अपघाताच्या काही क्षण आधी पोलिसांना कॉल करत आपल्यावर हल्ला होत असून मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पोलिसांनाही हा अपघात नसून घातपात असल्याचे लक्षात आले. आणि त्यांनी त्या दृष्टीने तपास केला.

ज्युरीने रेखा कारवान आणि रईस जमाल यांना हत्येसाठी दोषी ठरवले, तर नताशा अख्तर, अमीर जमाल आणि सनफ गुलामुस्तफा यांना मनुष्यवधाचा दोषी ठरवण्यात आले. दुसरा सहआरोपी मोहम्मद पटेल याला निर्दोष मुक्त केले.

हत्येमागचे कारण...

पीडितांच्या कुटुंबीयांनी कोर्टाच्या या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले. या प्रकरणी 1 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

लीसेस्टर पोलिसांनी (Leicester Police) दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा तपास सुरू केला असताना, असे समोर आले की, पीडितांपैकी एक साकिब हुसैनचे सुमारे तीन वर्षांपासून महेक भुकारीची आई अन्सरीन बुखारी यांच्याशी संबंध होते.

चौकशीत असे दिसून आले की अन्सरीन बुखारीने हुसेनशी संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हुसैनला हे मान्य नव्हते.

त्याने अन्सरीन बुखारीच्या पतीला त्यांच्या अफेअरबद्दल सांगण्याची आणि अन्सरीन बुखारीचे लैंगिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची धमकी दिली होती. असे लीसेस्टर पोलिसांनी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT