Water Intoxication: अति पाणी पिणाऱ्यांनो सावध व्हा! 20 मिनिटांत 2 लिटर पाणी प्यायल्याने महिलेने गमावला जीव

Water Intoxication: तरीही कमी कालावधीत जास्त पाणी पिण्याची सवय अनेकांना घतक ठरू शकते. कारण मूत्रपिंडे प्रत्येक तासाला जास्तीत जास्त एक लिटर पाणी साफ करू शकतात.
Water Intoxication|Ashley Summers
Water Intoxication|Ashley SummersDaini Gomantak
Published on
Updated on

American Woman Lost Life After Drinking 2 Liters of Water Within 20 Minutes:

अमेरिका सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 मिनिटांच्या कालावधीत सुमारे दोन लिटर पाणी प्यायल्याने दोन चिमुकल्यांची आई असलेल्या एका 35 वर्षीय अमेरिकन महिलेचा मृत्यू झाला आहे. अॅशले समर असे महिलेचे नाव आहे.

अॅशले समरच्या मृत्यूनंतरही तिचे हृदय, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि तिच्या काही लांब हाडांच्या ऊतींचे दान करण्यात आले, ज्यामुळे आणखी पाच जीव वाचले, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

ही महिला कमी कालावधीत अति पाणी प्यायल्याने तिला पाण्याची विषबाधा झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कमी कालावधीत जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.

हे असे प्रकार तुलनेने दुर्मिळ आहे. तरीही कमी कालावधीत जास्त पाणी पिण्याची सवय अनेकांना घतक ठरू शकते. कारण मूत्रपिंडे प्रत्येक तासाला जास्तीत जास्त एक लिटर पाणी साफ करू शकतात.
डॉ. आलोक हरवानी, अर्नेट हॉस्पिटल

अॅशले समर्स (Ashley Summers) नावाची महिला तिच्या पती आणि दोन लहान मुलींसोबत जुलैच्या वीकेंडला इंडियाना येथील लेक फ्रीमन येथे ट्रीपसाठी गेले होते.

तेव्हा तेथील उष्णतेमुळे तिला खूप तहान लागू लागली. अशात या महिलेने 20 मिनिटांत चार बाटल्या पाणी प्यायले. ही प्रत्येक बाटली अर्था लिटरची होती.

Water Intoxication|Ashley Summers
Pakistan: पाकिस्तानच्या नापाक रणनितीचा पर्दाफाश, टूलकिटच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्यासाठी...

ट्रीपच्या शेवटच्या दिवशी या महिलेने डोके दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिला वाटले की ती आता पाणी पिऊ शकणार नाही आणि जमीनीवर कोसळली.

समर्स बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने आययू हेल्थ अर्नेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, ती पुन्हा शुद्धीवर आलीच नाही, पाण्यातील विषबाधेमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Water Intoxication|Ashley Summers
COVID-19 Variant EG.5.1 in UK: ब्रिटनमध्ये कोरोनाच्या 'एरिस' व्हेरिएंटचा हाहाकार, जाणून घ्या किती धोकादायक आहे?

जेव्हा एखादी व्यक्ती कमी कालावधीत जास्त पाणी पिते तेव्हा मूत्रपिंडात (Kidneys) अति प्रमाणात पाणी साठते त्यातून पाण्याची विषबाधा (Water Intoxication) होते. स्नायू ताणने, मळमळ आणि डोकेदुखी ही या दुर्मिळ स्थितीची लक्षणे आहेत.

IU हेल्थ अर्नेट हॉस्पिटलचे टॉक्सिकोलॉजिस्ट डॉ. ब्लेक फ्रोबर्ग यांच्या मते, तीव्र उन्हाळ्यात किंवा उन्हात काम करत असल्यास पाण्याची विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते.

त्यांनी सुचवले की लोकांनी पाण्याबरोबर अधून मधून इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम आणि सोडियम असलेले द्रव प्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com