Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: OMG! चक्क तीन वाघ कारमध्ये घुसले; पुढे चालकाने जे केलं, ते पाहून थक्क व्हाल!

Viral Tiger Video: सोशल मीडियाच्या जगात काही गोष्टी अशा व्हायरल होतात, ज्या पाहून आपले डोके चक्रावून जाते.

Manish Jadhav

Viral Tiger Video: सोशल मीडियाच्या जगात काही गोष्टी अशा व्हायरल होतात, ज्या पाहून आपले डोके चक्रावून जाते. त्यातही जर गोष्ट वाघांसारख्या जंगली प्राण्यांची असेल, तर आश्चर्य आणि भीती दोन्ही वाढते. सध्या असाच एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यात तीन वाघ एकापाठोपाठ एक कारमध्ये घुसताना दिसत आहेत आणि त्यानंतर चक्क कारचा चालक त्यांना घेऊन फिरायला निघतो. हा व्हिडिओ पाहून लोक अक्षरशः थक्क झाले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कार बर्फाळ प्रदेशात उभी असल्याचे दिसत आहे. कारचा चालक खिडकी उघडी ठेवून बसला आहे. तेवढ्यात एक वाघ येतो आणि अचानक कारच्या खिडकीतून आत उडी मारतो. तो वाघ आत जाऊन मागच्या सीटवर बसतो. काही वेळाने कारचा चालक गाडीचा मागचा दरवाजाही उघडतो. हे पाहून आणखी एक वाघ (Tiger) गाडीकडे धावत येतो आणि तोही कारमध्ये घुसतो. थोड्या वेळाने त्याच कारमध्ये तिसऱ्या वाघाची एंट्री होते.

तिन्ही वाघ कारमध्ये बसल्यानंतर तो चालक ती कार घेऊन तिन्ही वाघांसह सैर करताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की, ते वाघ त्या व्यक्तीने पाळलेले आहेत आणि त्यांचा मालक या वाघांना फिरायला घेऊन निघाला आहे. हा व्हिडिओ इतका अनोखा आहे की तो पाहून लोक तोंडात बोटं घालत आहेत.

दुसरीकडे, हा व्हिडिओ सोशल साईट 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 82 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 1 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ रशियामधील (Russia) असल्याचे म्हटले आहे.

तसेच, या व्हिडिओवर कमेंट्सचा पूर आला आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, "तीन वाघांना कारमध्ये बसवून फिरायला घेऊन जाण्याचे धाडस कौतुकास्पद आहे." तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, "वाटतंय वाघांनी ओला बुक केली होती, पण ड्रायव्हरला माहीत नव्हतं की प्रवासी इतके धोकादायक असतील."

हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे, ज्यामुळे जगभरातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: 'अव्वल'साठी गोवा मैदानात, कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत चंडीगडविरुद्ध लढत

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: सर्वत्र खंडणी, भ्रष्टाचार! गोव्यातील आणखी एका भाजप नेत्याचा सरकारवर आरोप; केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT