Viral Video: गोवा आवडण्याचं कारण हेच! कलिंगडच्या ज्यूसऐवजी मिळाली बिअर, तोंड धुवायला पाण्याऐवजीही बिअरच! पाहा व्हिडिओ

Goa Viral Video: सोशल मिडियावर सध्या एक भन्नाट आणि मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, गोव्यात अगदी साध्या गोष्टींसाठीही बिअर सहज उपलब्ध होते.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मिडियावर सध्या एक भन्नाट आणि मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, गोव्यात अगदी साध्या गोष्टींसाठीही बिअर सहज उपलब्ध होते. व्हिडिओमध्ये पाणी मागितल्यावरही त्या तरूणाला बिअरच मिळते. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओत एक तरुण कलिंगडाचा ज्यूस मागतो, पण त्याला थेट बिअरची बाटली देण्यात येते. नंतर तो पाणी प्यायला मागतो, तेव्हा त्याला पाण्याच्या ग्लासाऐवजी बिअरने भरलेला ग्लास मिळतो.

इतकंच नाही तर, तो तोंड धुण्यासाठी नळाजवळ जातो, पण नळाला पाणी नसल्याने पाणी मागतो आणि तिथेही त्याला बिअरच दिली जाते. शेवटी हा तरुण बिअरनेच तोंड धुतो. या व्हिडिओवर "the reason i love goa" असं लिहिलं आहे.

हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवण्यात आला असला तरी गोव्यात दारूची सहज उपलब्धता आणि इतर राज्यांच्या तुलनेत कमी दर हे या प्रकारामागचं वास्तव आहे.

गोवा हे टुरिस्ट फ्रेंडली राज्य असल्यामुळे येथे दारूवर कर कमी असून ती सहज आणि माफक दरात मिळते. त्यामुळे गोवा हा अनेक तरुणांचा आणि पर्यटकांचा ‘फेवरेट’ डेस्टिनेशन ठरत आहे.

सोशल मिडियावर या व्हिडिओला हजारोंनी लाईक्स आणि शेअर्स मिळत असून, अनेकांनी मजेशीर कमेंट्ससह गोव्यातील मोकळं वातावरण आणि ‘चिल’ संस्कृतीचं कौतुक केलं आहे. काहींनी यावर विनोदी अंदाजात प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com