Israel-Hezbollah Tensions Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hezbollah Tensions: इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन कमांडर ठार, लेबनीज दहशतवादी संघटनेचा IDF मुख्यालयावर हल्ला

Israel-Hezbollah Tensions: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, लेबनॉन सीमेवरही या युद्धामुळे तणाव वाढला आहे.

Manish Jadhav

Israel-Hezbollah Tensions: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, लेबनॉन सीमेवरही या युद्धामुळे तणाव वाढला आहे. इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाचे तीन कमांडर मारले गेले आहेत. याशिवाय, हिजबुल्लाच्या ड्रोनने इस्रायली लष्कराच्या उत्तरी कमांडवरही हल्ला केला. 7 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमास यांच्यात सतत संघर्ष सुरु असून, यामध्ये आतापर्यंत सुमारे 24 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिजबुल्लाचे तीन कमांडर दक्षिण लेबनॉनच्या नाबतीह भागात एका कारमध्ये होते. यावेळी त्यांच्यावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, इस्रायलने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, आयडीएफचे म्हणणे आहे की, त्यांच्या युद्धविमानांनी किला गावाजवळील हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधांवर आणि रॉकेट उडवण्याच्या तयारीत असलेल्या पथकावर हल्ला केला. वृत्तानुसार, IDF ने नमूद केलेला हल्ला नबतीह हल्ल्यापेक्षा वेगळा आहे.

हिजबुल्लानेही हल्ला केला

दरम्यान, हिजबुल्लाने मंगळवारी हिजबुल्ला कमांडर विसम ताविल आणि हमासचे उपप्रमुख सलाह अरौरी यांच्या हत्येचा बदला घेतला. हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोनने हल्ला केला. सेफड शहरात असलेल्या आयडीएफच्या नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयावर ड्रोनने हल्ला केला.

इस्रायलने जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या अपवित्र कृत्याचा हा बदला असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने म्हटले की, इस्रायली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकले होते. इस्रायलचे सैन्य हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. हमासचे प्रवक्ते गाझी हमद याने अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे. हमादने म्हटले की, इस्रायल कधीही चांगला शेजारी आणि शांतताप्रिय देश असू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT