This person sleeps only 30 minutes every day for 12 years Dainik Gomantak
ग्लोबल

'हा' जपानी माणूस 12 वर्षांपासून दररोज झोपतोय फक्त 30 मिनिटं

डायसुकीने सांगितले की पूर्वी तो दिवसाला सुमारे 8 तास झोपायचा पण हळूहळू त्याने झोपेची वेळ कमी करून 30 मिनिटे केली.

दैनिक गोमन्तक

असे म्हटले जाते की निरोगी (Healthy) शरीरासाठी दिवसातून किमान 7-8 तास झोपणे खूप महत्वाचे आहे. पण जपानमध्ये (Japan) राहणाऱ्या एका माणसाने असा दावा केला आहे की तो गेल्या 12 वर्षांपासून संपूर्ण दिवसात फक्त 30 मिनिटे झोपतो

ही व्यक्ती संपूर्ण दिवसात फक्त अर्धा तास झोपते

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव डायसुकी होरी (Daisuke Hori) आहे. डायसुकीने सांगितले की पूर्वी तो दिवसाला सुमारे 8 तास झोपायचा पण हळूहळू त्याने झोपेची वेळ कमी करून 30 मिनिटे केली. गेली 12 वर्षे तो दिवसातून फक्त अर्धा तास झोपतो.

या व्यक्तीने झोपेवर हा दावा केला

डायसुकीने सांगितले की ते जपान शॉर्ट स्लीपर असोसिएशनचे (Japan Short Sleeper Association) अध्यक्ष आहेत. कमी झोपेनेही तंदुरुस्त कसे राहावे हे त्याने शेकडो लोकांना शिकवले आहे. यामुळे त्यांची जीवनशैली उत्पादक बनली आहे.

झोपेची वेळ कशी कमी केली?

त्याने सांगितले की त्याला दिवसातील 16 तास काम करण्यास कमी वाटते. त्याचा असा विश्वास आहे की जर तुम्ही दिवसातून 8 तास झोपत असाल तर तुम्हाला हवे ते मिळू शकत नाही. यानंतर त्याने झोपेचे तास कमी करण्यास सुरुवात केली.

काही वर्षांच्या सरावानंतर त्याने आपली झोप कमी केली आणि आता तो फक्त 30 मिनिटे झोपतो असे डायसुकीने सांगितले. त्याला कधीही अलार्म सेट करण्याची गरज नाही पडत. त्याचे डोळे स्वतःच उघडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT