Passport Dainik Gomantak
ग्लोबल

Passport: पासपोर्टशिवाय या तीन व्यक्तींना जगात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य, कोण आहेत?

Passport System: जगातील कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचे असल्यास पासपोर्ट आवश्यक असतो.

दैनिक गोमन्तक

Travel Documents: जगातील कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचे असल्यास पासपोर्ट आवश्यक असतो. पासपोर्टशिवाय कोणतीही व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही. राष्ट्रपती ते पंतप्रधान जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांनाही डिप्लोमॅटिक पासपोर्ट ठेवावा लागतो.

दरम्यान, पासपोर्ट (Passport) हा व्यक्तीची वैयक्तिक ओळख आणि राष्ट्रीयत्व प्रमाणित करतो. पासपोर्टमध्ये धारकाचे पूर्ण नाव, फोटो, जन्म ठिकाण, जन्मतारीख, स्वाक्षरी आणि पासपोर्टची कालबाह्यता तारीख असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, जगात असे तीन खास लोक आहेत, ज्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज नाही.

ब्रिटनचा राजा

राजा चार्ल्स तिसरे या महिन्यात ब्रिटनचे (Britain) राजे झाले आहे. त्यांची आई आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे हे पद आले. ते राजा होताच, ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांना सूचित केले की, ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना संपूर्ण आदराने जगात कुठेही प्रवास करण्याची परवानगी दिली जावी आणि त्यांच्या प्रोटोकॉलची विशेष काळजी घेतली जावी. किंग चार्ल्स यांच्या आधी, त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांना पासपोर्टशिवाय जगात कुठेही जाण्याचा अधिकार होता.

दुसरीकडे, सिंहासनी विराजमान झाल्यानंतर राजा किंवा राणीला पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा अधिकार मिळतो. मात्र राजा चार्ल्स III यांच्या पत्नीला परदेशात जायचे असल्यास त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्टची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या काळात त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांनाही परदेशात जाण्यासाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट बाळगावा लागला होता.

जपानचा सम्राट आणि सम्राज्ञी

सध्या जपानचे (Japan) सम्राट नारुहितो आहेत आणि त्यांची पत्नी मासाको ओवाडा या जपानची सम्राज्ञी आहेत. सम्राट आणि सम्राज्ञींना पासपोर्टशिवाय परदेशात जाण्याची व्यवस्था 1971 मध्ये सुरु झाली. जपान जगातील सर्व देशांना अधिकृत पत्र पाठवते की, हे पत्र सम्राट आणि सम्राज्ञींना त्यांच्या देशात जाण्यासाठी त्यांचा पासपोर्ट समजावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suleman Siddiquie: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात! न्यायालयाचे निर्देश; 8 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

SCROLL FOR NEXT