Passport: परदेशात जाण्याची घाई असेल तर 15 दिवसांत घरी येईल पासपोर्ट, ही संपूर्ण प्रक्रिया

Indian Passport: आता तुम्ही घरबसल्या सहजपणे पासपोर्ट बनवू शकता आणि त्यासाठी अर्ज करु शकता.
Passport
PassportDainik Gomantak
Published on
Updated on

Apply For Tatkal Passport Online: जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर साहजिकच तुम्हाला पासपोर्ट लागतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत, लोक पासपोर्ट मिळवण्यासाठी घाबरत होते कारण त्याची प्रक्रिया खूप कठीण होती, परंतु आता तसे नाही. आता तुम्ही घरबसल्या सहजपणे पासपोर्ट बनवू शकता आणि त्यासाठी अर्ज करु शकता.

दरम्यान, तुम्हालाही परदेशात जायचे असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण या बातमीत आम्ही तुम्हाला पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सांगणार आहोत जी खूप सोपी आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. प्रत्यक्षात आता ज्यांना त्वरीत पासपोर्ट हवा आहे, त्यांना सरकारकडून तत्काळ पासपोर्टची सुविधा दिली जात आहे, ज्यामध्ये पासपोर्ट (Passport) बनवायला वेळ लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया त्याची प्रक्रिया...

Passport
Tips to Re-issue Passport| पासपोर्ट हरवला आहे? तर मग या मार्गाने बनवा नवीन पासपोर्ट

याप्रमाणे अर्ज करा

1- ऑनलाइन पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तिथे नवीन यूजरचा बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही नोंदणी पेजवर याल. इथे तुम्ही मागितलेली माहिती भरा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचे पासपोर्ट ऑफिस निवडा, कारण तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी त्याच पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.

2- माहिती भरल्यानंतर तुम्हाला रजिस्टर टॅबवर क्लिक करावे लागेल. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला पासपोर्ट सेवा वेबसाइटवर परत यावे लागेल आणि ग्रीन लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल. इथे तुमचा ईमेल आयडी टाका आणि Continue पर्यायावर क्लिक करा.

Passport
Passport Ranking: या आशियाई देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली, जाणून भारताचे स्थान

3- इथे तुम्हाला Apply for Fresh Passport किंवा Issu of Passport वर क्लिक करावे लागेल. तुम्ही इथे फॉर्म डाउनलोड करु शकता आणि तो भरु शकता. त्यानंतर वेबसाइटवर अपलोड करण्याचा पर्याय निवडू शकता किंवा तुम्ही तो ऑनलाइन देखील भरु शकता. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी आणि भरण्यासाठी, फॉर्मची (Form) सॉफ्ट कॉपी डाउनलोड करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. फॉर्म भरल्यानंतर View Saved Submit Application वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला अर्जासाठी पैसे द्यावे लागतील आणि पडताळणीसाठी शेड्यूल घ्यावे लागेल.

4- ऑनलाइन पेमेंट (Online Payment) केल्यानंतर, तुम्ही पासपोर्ट सेवा वेबसाइटवर पोहोचाल. इथे एक नवीन पेज उघडेल, ज्यावर अपॉइंटमेंट लिहिलेले असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल. आता तुम्ही प्रिंट ऍप्लिकेशनवर क्लिक करुन ते डाउनलोड करु शकता.

Passport
Passport Update: पासपोर्टमध्ये तुमच्या जोडीदाराचे नाव स्वतः करू शकता अपडेट

5- फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवा कारण पासपोर्ट सेवा केंद्रात प्रवेशासाठी त्याची आवश्यकता असते. यानंतर तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रात जावे लागेल. सर्व कागदपत्रांची पडताळणी आणि पोलीस पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा पासपोर्ट तयार होईल.

Passport
E-Passport : आता तुमच्या पासपोर्टमध्ये लावण्यात येणार इलेक्ट्रॉनिक चिप

तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा

जेव्हा तुम्ही पासपोर्ट पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जाता, तेव्हा तुम्हाला New User Registration वर क्लिक करावे लागेल. माहिती भरल्यानंतर, तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध होतील, पहिला पर्याय फ्रेशसाठी आहे, तर दुसरा पर्याय री इश्यूसाठी आहे. ते निवडल्यानंतर, तुम्हाला तत्काळ पर्याय निवडावा लागेल. पोलिस पडताळणीनंतर, तुमचा पासपोर्ट 10 ते 15 दिवसांत स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी पोहोचवला जाईल, ज्यामुळे तुम्ही परदेशात सहज प्रवास करु शकाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com