Quarrel Dainik Gomantak
ग्लोबल

'फ्लाइट में फाइट', फ्लाइटमध्येचं प्रवाशांनी धरली एकमेकांची गच्चुरी, VIDEO व्हायरलं

भांडण (Quarrel) हे मानवी प्रवृत्ती लक्षण आहे.

दैनिक गोमन्तक

भांडण हे मानवी प्रवृत्ती लक्षण आहे. याच लक्षणाची प्रचिती मँचेस्टरहून अ‍ॅमस्टरडॅमला जाणाऱ्या KLM फ्लाइटमध्ये आली. प्रवासादरम्यान 6 प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. ट्विटर यूजर्सने @MayaWilkinsonx द्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, दोन प्रवासी एका प्रवाशाला खाली धरुन ठेवताना दिसत आहेत, कारण दुसरा प्रवाशांचा गट त्याला मारु शकेल. त्यातच फ्लाइट कॅप्टन हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु ते हे भांडण सोडवण्यात अपयशी ठरतात. व्हिडिओ पोस्ट करणार्‍या प्रवाशानुसार, एका प्रवासी गटाने सहप्रवाशावर वर्णद्वेषी टिप्पणी केल्यानंतर ब्रिटिश नागरिकांमध्ये (Citizens) भांडणाची ठिणगी पडली. (There was fierce fight between passengers in flight VIDEO)

दरम्यान, व्हिडीओ जसजसा पुढे जातो तसतसे, केबिन क्रू परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. वैमानिक प्रवशांना भाडंण थांबवण्याचं आवाहन करतो. डच न्यूजनुसार, भांडणामध्ये सहभागी असलेल्या सहा प्रवाशांपैकी एका प्रवाशाला (Travel) किरकोळ जखम झाली. डच पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सहा ब्रिटिश प्रवाशांच्या वर्तनाची चौकशी सुरु केली आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ट्विटरवर फुटेज पोस्ट करणाऱ्या प्रवाशाने सांगितले की, "आम्ही नुकतेच अ‍ॅमस्टरडॅममध्ये उतरलो. ते जवळपास अर्ध्याहून अधिक तास फ्लाइटमध्ये भांडण करत होते. मी मागे बसलो होतो, त्यांनी एका आशियाई मुलावर वर्णद्वेषी टिप्पणी केली, त्यानंतर तो ओरडायला लागला परंतु तो ढळला नाही. लॉकरमधून बॅग बाहेर काढत असताना तो त्या ब्रिटीश प्रवाशांना भांडू लागला."

याशिवाय, एअरलाइनच्या (Airline) प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, "काल आमच्या KLM 1070 फ्लाइटमध्ये मँचेस्टरहून अ‍ॅमस्टरडॅमला जाणाऱ्या विमानात काही प्रवासी होते. कॅप्टन आणि केबिन क्रू यांनी प्रवाशांच्या दोन गटांमधील वाद मिटवला. भांडण करणाऱ्यांना शिफोल विमानतळावर उतरवण्यात आले. प्लाइट लॅन्ड होताच विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना अटक केली. KLM कर्मचारी किंवा प्रवाशांबद्दल आक्रमकता आम्ही सहन करत नाही. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या आमच्या प्रवाशांची आम्ही माफी मागतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT