जगाला रशिया आणि युक्रेन यांच्यातील (Ukraine) वाद सर्वश्रुत आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की (Vlodimir Zelenski) यांनी शुक्रवारी सांगितले की, ''रशियाबाबत युध्दजनक (Ukraine-Russia Relations) परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु युध्दासाराखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत बैठक घेण्यास आवडेल,'' अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. याल्टा युरोपीयन स्ट्रॅटेजी (YES) शिखर परिषदेत, झेलेन्स्की यांना विचारण्यात आले की, खरोखरच रशियाबरोबर युद्ध होऊ शकते का? यावर ते म्हणाले, 'मला वाटते की हे होऊ शकते. ही सर्वात वाईट गोष्ट असेल, परंतु दुर्दैवाने अशी शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine) संघर्ष सात वर्षांपासून सुरु असून त्यात हजारो लोकांचा बळी गेला आहे. याला अघोषित युद्ध म्हणतात. 2014 मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनमधून क्रिमियन द्वीपकल्प (Crimean Peninsula) आपल्या ताब्यात घेतला तेव्हा या युध्दाची सुरुवात झाली, मात्र अद्याप अनेक पाश्चिमात्य शक्तींनी त्यास अधिकृत अशी मान्यता दिलेली नाही. हा संघर्ष पुढे युक्रेनच्या पूर्व भागात पसरला. येथील डॉनबास प्रदेशात, मॉस्को समर्थित अलगाववादी आहेत. यामुळे सीमेवर 10 हजारांहून अधिक सैनिक तैनात होते. 2014 पासून, पूर्व युक्रेनमध्ये 14,000 लोक मरण पावले आहेत.
युक्रेनच्या नाटो सैन्य आघाडीत सामील झाल्यामुळे
झेलेन्स्की, नाटो लष्करी आघाडीत सामील (Nato military alliance) होण्याच्या त्यांच्या विनंतीकडे लक्ष वेधत म्हणाले, "युक्रेन बऱ्याच कालावधीपासून प्रतिक्षा करत आहे. युक्रेनचा नाटो सैन्य गठबंधनामध्ये सामील होणे हे त्याचेच एक पुढील पाऊल असू शकते. इंडिपेंडंट ऑनलाइन वृत्तपत्रातील एका अहवालात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, रशियाच्या बाजूने युद्धाची शक्यता ही सर्वात मोठी चूक असेल. ही एक भीतीदायक परिस्थिती आहे, परंतु दुर्दैवाने ती शक्यता आहे. परंतु हा धोका एका टप्प्यावर पोहोचला असून जिथून तो धोका टाळण्याची येण्याची शक्यता कमी आहे.
Zelensky यांनी पुतीन बद्दल सांगितले
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मते, मॉस्कोने युक्रेनवर शांतता चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची संधी गमावली आहे. तर झेलेन्स्कीने संघर्ष क्षेत्रात पुतीन यांच्यासोबत भेटीसाठी दबाव आणला आहे." मला दोन्ही देशात चर्चेच्या माध्यमातून योग्य तो तोडगा निघत असेल तर पुन्हा एकदा भेट घेण्यास आवडेल," असे झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा उल्लेख करत सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.