Army Dainik Gomantak
ग्लोबल

व्हाईट हाऊसचा रशियाला इशारा, युक्रेनवर हल्ला झाल्यास...

युक्रेनने (Ukraine) शुक्रवारी दावा केला की, रशियाने सीमेवर 94,000 हून अधिक सैन्य तैनात केले आहेत.

दैनिक गोमन्तक

व्हाईट हाऊसकडून (White House) रशियाला (Russia) इशारा देण्यात आला असून रशियाने आपल्या शेजारी देश असणाऱ्या युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिका (America) त्याच्यावर कारवाई करु शकते, असे सांगण्यात आले आहे. खरे तर युक्रेन आणि रशियाच्या सीमेवरील तणाव सातत्याने वाढत आहे. युक्रेनने (Ukraine) शुक्रवारी दावा केला की, रशियाने सीमेवर 94,000 हून अधिक सैन्य तैनात केले आहेत. जानेवारीच्या अखेरीस सीमेवर सैन्याच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर व्हाईट हाऊसकडून रशियाविरुद्ध कारवाईचे निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह (Oleksiy Reznikov) म्हणाले, सीमेजवळ आणि क्रिमियामध्ये रशियन सैन्याची संख्या 94,300 आहे. आमच्या गुप्तचर संस्थांचे विश्लेषण असे दर्शविते की, रशियन बाजूने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षापर्यंत परिस्थिती अधिक धोकादायक होऊ शकते.

युक्रेन आणि त्याचे पश्चिमी सहयोगी रशिया युक्रेनियन फुटीरतावाद्यांना शस्त्रे पुरवत असल्याचा आरोप करत आहेत. युक्रेनचे म्हणणे आहे की, याच फुटीरतावादी गटांनी 2014 मध्ये रशियाला क्राइमिया जोडण्यास मदत केली. रशियाने नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. रशियाने युक्रेनवर कोणतीही कारवाई केल्यास बायडन प्रशासन हस्तक्षेप करेल, असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी आज सांगितले. साकी पुढे म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) शेजारी देशावर हल्ला करण्यासाठी पावले उचलत आहेत. "म्हणूनच आम्हाला त्या भागात पूर्ण तयारी करायची आहे,"

याआधी बुधवारी युक्रेनने नाटोला संभाव्य हल्ला टाळण्यासाठी रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते. उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांना तोडगा काढण्यासाठी ते आवाहन करणार असल्याचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी सांगितले. युक्रेनियन सीमेवर रशियाच्या अलीकडील लष्करी उभारणीला प्रतिसाद देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी आणि शीतयुद्धानंतरच्या सर्वात भयानक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मंगळवारपासून नाटोचे परराष्ट्र मंत्री लॅटव्हियन राजधानी रीगा येथे भेटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT