Iraq Attack
Iraq AttackDainik Gomantak

आयएसच्या हल्ल्यात इराकमध्ये 9 जवान शहीद

इस्लामिक स्टेटने अद्यापही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 2017 मध्ये IS ला इराकमधून बाहेर काढण्यात आल्यापासून दहशतवादी
Published on

Iraq Attack : इस्लामिक स्टेट (IS) च्या दहशतवाद्यांनी (Terrorist) उत्तर इराकमधील (Iraq) एका गावावर केलेल्या हल्ल्यात कुर्दिश सैन्य दलातील जवान शहिद झाले आहेत. यात आसपासचे नागरिक देखील मरण पावले आहेत. हा आकडा सध्या 12 असून घटना स्थळी आणखी कोणी अडकले आहे का याचा सोध घेऊन जखमींना रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. कुर्दिश मीडियाच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी रात्री उशिरा मखमोर प्रदेशातील एका गावात कुर्दिश पेशमर्गा सैन्याशी दहशतवाद्यांची चकमक झाली, ज्यात नऊ सैनिक आणि तीन नागरिक ठार (killed) झाले.

Iraq Attack
पाकिस्तानात कट्टरवाद्यांची क्रूरता; श्रीलंकन​नागरिकाची केली हत्या

मात्र, इस्लामिक स्टेटने अद्यापही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 2017 मध्ये IS ला इराकमधून बाहेर काढण्यात आल्यापासून दहशतवादी कुर्दिस्तान या इराकी फेडरेशनच्या स्वायत्त प्रदेशात छुपे हल्ले करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे हल्ले वाढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com