Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळणे 'असंवैधानिक': सर्वोच्च न्यायालय

इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळणे घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळणे घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाकिस्तानातील राजकीय पेचप्रसंगानंतर नव्याने निवडणुका घेण्याची तयारी सुरु झाली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, 'निवडणुका घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल.' विशेष म्हणजे, नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर आणि राष्ट्रपतींनी संसद बरखास्त करुन पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकरणावर गुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी सुरु केलीय. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी न्यायमूर्ती एजाज-उल अहसान, न्यायमूर्ती मजहर आलम खान मियांखाइल, न्यायमूर्ती मुनीब अख्तर आणि न्यायमूर्ती जमाल खान मंडोखाइल यांचा समावेश आहे. खंडपीठात सकाळी या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली.(The Supreme Court has said that rejecting the no-confidence motion against Imran Khan is unconstitutional)

'डॉन' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बंदियाल यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांचे वकील सिनेटर अली जफर यांना विचारले की, 'जर सर्व काही संविधानानुसार चालत असेल, तर देशात घटनात्मक संकट कुठे आहे? देशात घटनात्मक संकट आहे की नाही हे ते का सांगत नाहीत?” सुनावणीदरम्यान मियांखाइल यांनी जफर यांना विचारले की, 'पंतप्रधान लोकप्रतिनिधी आहेत का? तर वकिलाने होय असे उत्तर दिले.' मियांखाइल यांनी तेव्हा विचारले की, 'संसदेत संविधानाचे उल्लंघन झाल्यास पंतप्रधानांचे रक्षण होईल का?', यावर जफर यांनी उत्तर दिले की, 'संविधानात घालून दिलेल्या नियमांनुसार संरक्षण केले पाहिजे. संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक कलम लक्षात ठेवावे लागते.' 'फक्त एका सदस्यावरच नव्हे तर संपूर्ण संसदेवर अन्याय होतो तेव्हा काय होईल,' असा सवाल बंदियाल यांनी केला.

तसेच, विशेष म्हणजे, कथित "परकीय कटा" बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी न्यायालयाने बुधवारी सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) बैठकीचा तपशील मागवला आहे. इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागेल की नाही यावरील निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. संसदेने राज्यघटनेचे उल्लंघन केले आहे की नाही हे ही ठरवले जाईल. नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी रविवारी अविश्वास प्रस्ताव फेटाळला. सरकार पाडण्याच्या तथाकथित परकीय कारस्थानाशी त्यांचा संबंध असल्याचे नमूद केले. काही मिनिटांनंतर राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान खान यांच्या सूचनेनुसार नॅशनल असेंब्ली विसर्जित केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT