Nepal Women Dainik Gomantak
ग्लोबल

Census: 'या' हिंदू देशाच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक आकडेवारी आली समोर, पुरुषांपेक्षा...

Nepal Census: हिंदू राष्ट्र नेपाळमध्ये नुकतीच जनगणना झाली. दरम्यान, भारताच्या शेजारील देश नेपाळची लोकसंख्या गेल्या 11 वर्षांत 25 लाखांनी वाढली आहे.

Manish Jadhav

Nepal Census: हिंदू राष्ट्र नेपाळमध्ये नुकतीच जनगणना झाली. दरम्यान, भारताच्या शेजारील देश नेपाळची लोकसंख्या गेल्या 11 वर्षांत 25 लाखांनी वाढली आहे. जनगणनेची ताजी आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली. या जनगणनेतील एक आकडेवारी धक्कादायक आहे. या देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे.

दरम्यान, पुरुषांची संख्या 48 टक्क्यांहून अधिक आणि महिलांची संख्या 51 टक्क्यांहून अधिक आहे. नेपाळमध्ये इतर देशांप्रमाणेच दर 10 वर्षांनी जनगणना होते.

नेपाळमध्ये गेल्या 11 वर्षांत ज्या प्रकारे लोकसंख्या 2.5 दशलक्षने वाढली आहे, त्यानुसार दरवर्षी लोकसंख्या दोन दशलक्षांनी वाढली आहे. नेपाळमध्ये (Nepal) नोव्हेंबर 2021 मध्ये जनगणना झाली.

ताज्या आकडेवारीनुसार, आता नेपाळची लोकसंख्या 2,91,64,578 झाली आहे. 2011 च्या जनगणनेत देशाची लोकसंख्या 2,64,94,504 इतकी नोंदवली गेली.

तसेच, काठमांडू येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी जनगणनेची ताजी आकडेवारी जाहीर केली.

निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, देशात फेडरल गव्हर्नन्स पद्धतीचा अवलंब केल्यानंतर प्रथमच ही जनगणना करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील विविध प्रांतातील जनगणनेचे आकडेही समोर आले आहेत.

संघराज्य पद्धतीनुसार सात प्रांत स्थापन करण्यात आले. याशिवाय 733 स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली.

सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बागमती, दुसरा मधेश

जनगणनेच्या आकडेवारीनुसार बागमती हा सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत म्हणून समोर आला आहे. तिथे 61 लाख 20 हजारांहून अधिक लोक आहेत.

अशा प्रकारे, देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये या प्रांताचा वाटा सुमारे 21 टक्के आहे. मधेश हा नेपाळचा दुसरा सर्वात मोठा प्रांत असून त्याची लोकसंख्या 61 लाख 10 आहे.

ही संख्या LGBT समुदायाची आहे

ताज्या आकडेवारीनुसार, देशात पुरुषांची संख्या 1,42,53,551 आहे. अशा प्रकारे एकूण लोकसंख्येमध्ये पुरुषांचे प्रमाण 48.98 टक्के आहे.

तर महिलांचा वाटा 51.02 टक्के आहे. महिलांची संख्या 1,49,11,027 इतकी आहे. देशात LGBTQ ची संख्या 0.01 टक्के आहे. त्यांची एकूण संख्या 2,928 आहे. देशाच्या लोकसंख्येच्या 66.17 टक्के महानगरे आणि शहरांमध्ये राहतात. एकूण लोकसंख्येपैकी 33.17 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT