offices Dainik Gomantak
ग्लोबल

दक्षिणपूर्व आशियामध्ये चार दिवसांच्या आठवड्याचा ट्रेंड

पूर्व आशियातील (East Asia) कंपन्या आणि सरकारी कार्यालयांमध्ये चार दिवसांचा कामाचा आठवडा सुरु करण्याच्या योजनेची चाचणी घेतली जात आहे.

दैनिक गोमन्तक

पूर्व आशियातील कंपन्या आणि सरकारी कार्यालयांमध्ये चार दिवसांचा कामाचा आठवडा सुरु करण्याच्या योजनेची चाचणी घेतली जात आहे. थकवा निर्माण करणाऱ्या कार्यशैलीपासून कर्मचाऱ्यांना (Employees) मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे. आठवड्यातून फक्त चार दिवस काम करण्याचा सराव सुरु केला तर उत्पादकतेवर काय परिणाम होईल, हे या चाचणीदरम्यान पाहिले जात आहे. (The plan to launch a four day work week in East Asian companies and government offices is being tested)

दरम्यान, NikkeaAsia.com या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, जपानमध्ये कठोर परिश्रमाचे वर्क कल्चर निर्माण झाले आहे. इथे दररोज कामाचा दिवस मोठा असतो. त्यामुळेच या योजनेत सर्वाधिक रस घेतला जात आहे. जपानी कंपनी हिटाचीने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की, 'आम्ही या आर्थिक वर्षात आपल्या 15,000 कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा कामाचा आठवडा सुरु करणार आहोत.' जपानमध्ये (Japan) आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. Pokémon सारख्या लोकप्रिय गेमसाठी ओळखल्या जाणार्‍या गेम डेव्हलपर कंपनी गेम फ्रीकने आपल्या कर्मचाऱ्यांच्या काही गटासाठी चार दिवसांचा आठवडाही सुरु केला आहे. रिपोर्ट्सनुसार Panasonic Holdings आणि NEC सारख्या मोठ्या कंपन्या देखील या दिशेने विचार करत आहेत.

इंडोनेशियातही सुरुवात झाली

निक्केई एशिया या वेबसाइटनुसार, जपानच्या तुलनेत वेग कमी असला तरी इतर अनेक देशांमध्ये या दिशेने पुढाकार घेण्यात आला आहे. इंडोनेशियातील आर्थिक क्षेत्रातील कंपनी अलमीने गेल्या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा सुरु केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी हे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण कोरियातील एडुविल ही शैक्षणिक कंपनी दक्षिण-पूर्व आशियामध्ये या दिशेने पावले उचलणारी पहिली कंपनी ठरली. 2019 मध्येच त्यांनी ही प्रणाली लागू केली. एडुविल यांच्याकडून प्रेरित होऊन, दक्षिण कोरियाच्या गेल्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह जस्टिस पार्टीचे उमेदवार सिम सेयुंग जंग यांनी वचन दिले की, 'जर आपण जिंकून आल्यास देशभरात चार दिवसांचा आठवडा लागू करु.' मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

तसेच, जपानची सर्वात मोठी कंपनी पर्सोल होल्डिंग्सने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत सर्वेक्षण केले. त्यापैकी 25.5 टक्के कर्मचार्‍यांनी सांगितले की, आम्ही तीन किंवा चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याला प्राधान्य देतो. दुसरीकडे, व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्येही सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या मते, व्हिएतनाममधील (Vietnam) 78 टक्के कामगार आणि इंडोनेशियातील 69 टक्के कामगारांनी कामाचा आठवडा कमी करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले.

कामाच्या ताणामुळे मृत्यू!

विश्लेषकांचे म्हणण्यानुसार, कोरोना महामारी आणि त्याच्या परिणामांमुळे कर्मचारी आता कार्यालयात जाण्यास उत्साही राहिलेले नाहीत. याशिवाय गेल्या काही दशकांत वाढलेल्या कलामुळेही त्यांच्यात असंतोष निर्माण होत आहे. या कारणास्तव करोशी हा शब्द जपानमध्ये प्रचलित झाला. म्हणजे कामाच्या ताणामुळे मृत्यू. जपानमध्ये 2021 मध्ये करोशीच्या भरपाईसाठी 2,800 हून अधिक अर्ज करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT