भारताने रशियाकडे केली 'ही' मागणी, पुतिन करणार का मान्य?

भारत सरकारने या अहवालावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही
india demands discount on russian crude oil amid soaring prices of fuel petrol
india demands discount on russian crude oil amid soaring prices of fuel petrol Danik Gomantak

सध्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा सामना करत असलेल्या रशियाकडून तेल खरेदीत अधिक शिथिलता देण्याची भारताची मागणी आहे. दरम्यान ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत रशियाकडून प्रति बॅरल $70 पेक्षा कमी दराने कच्चे तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110 डॉलर इतकी आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीत येणाऱ्या अडचणींची भरपाई करण्यासाठी सवलतीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, भारत सरकारने या अहवालावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असं देखील ब्लूमबर्ग यांनी सांगितले. (india demands discount on russian crude oil amid soaring prices of fuel petrol)

दरम्यान अहवालात असे म्हटले आहे की रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यापासून भारताच्या राज्य आणि खाजगी तेल शुद्धीकरण कारखान्यांनी रशियाकडून 40 दशलक्ष बॅरलहून अधिक कच्चे तेल सवलतीत खरेदी केले आहे. व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीचा हवाला देत ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 2021 मध्ये रशिया आणि भारत यांच्यातील कच्च्या तेलाच्या एकूण खरेदीपेक्षा हे प्रमाण 20 टक्के अधिक आहे. तसेच गेल्या महिन्यात देखील रशियाने भारताला 15 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाच्या एकवेळच्या खरेदीवर सवलत देऊ केली होती.

india demands discount on russian crude oil amid soaring prices of fuel petrol
केंद्र सरकारने सीमांकन आयोगाच्या अहवालाला दिली मान्यता

अमेरिका आणि युरोपियन युनियनसह पाश्चात्य देशांनीही या खरेदीवर भाष्य केले. मात्र भारत सरकारने यावर प्रतिक्रिया देत युरोपियन युनियननेही रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी केली असून देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताने या प्रस्तावाचे स्वागत केले. त्याच वेळी, युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी बुधवारी युरोपियन संसदेत रशियाचे तेलावरील (क्रूड आणि सुधारित) अवलंबित्व पूर्णपणे काढून टाकण्याच्या प्रस्तावाबद्दल सांगितले.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन वापरणारा देश असल्याचा अंदाज आहे. भारत दररोज सुमारे 5 दशलक्ष बॅरल तेल वापरतो आणि भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो, परंतु यामध्ये रशियन तेलाचा वाटा अत्यल्प आहे. S&P ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सच्या अंदाजानुसार 2021 मध्ये ते तीन टक्क्यांपेक्षा कमी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com