Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

कंगाल पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची ‘ऐश’

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी केलेल्या खर्चाबाबत अनेक अहवाल समोर येऊ लागले आहेत. पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी गरीब पाकिस्तानमध्ये खूप ऐश केली. त्यामुळे पाकिस्तानच्या तिजोरीवरही अधिक बोजा पडला. एकीकडे जनता गरिबी आणि महागाईने होरपळत असताना दुसरीकडे इम्रान यांनी भरपूर पैसा कमावला. वास्तविक, इम्रान खान यांनी त्यांच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात हेलिकॉप्टरने प्रवास करण्यासाठी किती खर्च केला ते आता पाकिस्तान सरकारने सांगितले आहे. इम्रान यांनी खर्च केलेली रक्कम ऐकाल तर थक्क व्हाल.

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात हेलिकॉप्टर खर्चावर 98 कोटी रुपये खर्च केले आहेत. इम्रान यांनी ऑगस्ट 2018 ते मार्च 2022 दरम्यान हे दौरे केले. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, हेलिकॉप्टरने एका तासाच्या प्रवासासाठी सुमारे 2,75,000 रुपये प्रति तास खर्च येतो. इम्रान यांच्या बनीगाला निवासस्थानापासून पीएम हाऊसचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत इम्रान खान आपली कार न वापरता केवळ 15 किलोमीटर अंतरासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान असताना इम्रान यांनी किती धमाल केली हे यातून दिसून येते.

इम्रान यांनी हेलिकॉप्टरचा वारेमाफ वापर केला

जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, जून 2018 ते मार्च 2022 पर्यंत माजी पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर सुमारे 98 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यापैकी 51 कोटी रुपये देखभाल दुरुस्तीवर, तर 47 कोटी रुपये उड्डाणासाठी खर्च करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, ''इम्रान यांनी बनीगाला येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानी जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वारेमाफ वापर केला.'' इम्रान आधीच गिफ्टच्या वादात अडकले आहेत. पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तू सरकारी तोषाखान्यात जमा करण्याऐवजी विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला आहे.

इम्रान खान यांचा लष्कराला इशारा

विशेष म्हणजे या महिन्याच्या मध्यात इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आले. अशाप्रकारे ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनले, ज्यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे हटवण्यात आले. त्याचवेळी एका रॅलीला संबोधित करताना इम्रान यांनी पाकिस्तानी लष्कराला इशारा दिला होता. इम्रान यांनी त्यांना सत्तेवरुन हटवण्यात सहभागी असलेल्यांना निवडणुका घेऊन चूक सुधारण्याचा इशारा दिला आहे. इम्रान खान म्हणाले की, ''निवडणुका जर झाल्या नाहीत तर आपले समर्थक राजधानीत पोहोचतील आणि आयात केलेले सरकार उलथून टाकतील.'' गुरुवारी रात्री ते लाहोरमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या रॅलीला संबोधित करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT