Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: भांडणात पठ्ठ्यानं केला चक्क 'सापाचा' हत्यार म्हणून वापर, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Social Media Viral Video: सोशल मीडियावर एक अतिशय धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहे.

Manish Jadhav

Social Media Viral Video: सोशल मीडियावर एक अतिशय धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्यक्ती आपल्या पाळीव सापाचा भांडणादरम्यान (Man Using His Pet Python As A Weapon) हत्यार म्हणून वापर करत आहे.

सापाच्या मदतीने हा व्यक्ती कशी झुंज देत आहे, हे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही अंचबित झाले आहेत.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ कॅनडातील टोरंटोमधील आहे. एका व्यक्तीने आपल्या पाळीव सापाचा भांडणादरम्यान शस्त्र म्हणून वापर केल्याचे सांगितले जात आहे.

सीबीसी न्यूजनुसार, बुधवारी सकाळी 11:50 वाजता ही घटना घडली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारत असल्याचे दिसून येत आहे. तर साप त्याच्या हातातून हवेत उसळी मारताना दिसत आहे.

तो सापाच्या साहाय्याने दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करत आहे. मात्र, त्यानंतर पोलिस (Police) घटनास्थळी येतात आणि दोघांना जमिनीवर झोपायला सांगतात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दुसरीकडे, हा व्हिडिओ Crazy Clips नावाच्या सोशल मीडिया (Social Media) यूजर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 45 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

त्याचबरोबर, या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. या प्रकरणाबद्दल सांगताना टोरंटो पोलिस म्हणाले की, टोरंटोचे 45 वर्षीय रहिवासी लॉरेनियो अविला यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्यासंबंधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT