Moscow Format
Moscow Format  Dainik Gomantak
ग्लोबल

Moscow Format मध्ये उद्या अफगाणिस्तान मुद्यावर चर्चा, भारत तालिबान होणार सहभागी

दैनिक गोमन्तक

मॉस्को फॉरमॅटची (Moscow Format) तिसरी बैठक बुधवारी रशियाच्या (Russia) राजधानीत होणार आहे. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थितीचा आढावा या बैठकीदरम्यान घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला भारतासह (India) दहा देशांचे उच्च अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या चर्चेमध्ये तालिबानलाही उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे तालिबानने आपले शिष्ठमंडळ या बैठकीसाठी पाठवले आहे. मॉस्को फॉरमॅट अंतर्गत होणाऱ्या या बैठकीत अफगाणिस्तानमधील राजकीय आणि लष्करी परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. स्पुतनिकच्या मते, अफगाणिस्तानला देण्यात आलेली मानवतावादी मदतीचा उल्लेख देखील यामध्ये करण्यात येणार आहे. अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर, तालिबान पहिल्यांदाच दहा देशांसमोर आपली भूमिका मांडणार आहे. या बैठकीला रशियाचे परराष्ट्र मंत्री लव्ह्रोव्ह संबोधित करणार आहेत.

दरम्यान, बैठकीनंतर एक संयुक्त निवेदनही जारी होण्याची शक्यता आहे. तालिबान सरकारच्या (Taliban government) परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालिबानच्या वतीने या बैठकीला उपस्थित असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे उपपंतप्रधान अब्दुल सलाम हनाफी (Abdul Salam Hanafi) करणार आहेत. त्यामध्ये असेही म्हटले आहे की, परस्पर सहकार्य आणि सहमत असलेल्या मुद्द्यांवर जगातील इतर देशांबरोबर पुढे जाण्याची तालिबानची योजना आहे. यासंबंधीचा उल्लेख Moscow Format 2017 मध्ये सादर हे करण्यात आला होता. या बैठकीमध्ये भारत आणि रशिया व्यतिरिक्त चीन, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान यांचा समावेश होता.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारताकडून घोषणा करण्यात आली आहे. भारत अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या घडामोडीवर बारीक नजर ठेवून आहे. इतर देशांबरोबरच भारतानेही तालिबानच्या मुद्द्यावर काही काळ वेट एन्ड वॉचची भूमिका घेतली होती. अफागाणिस्तानमध्ये शांतता निर्माण व्हावी अशी भारताची इच्छा आहे. भारताला आशियाई क्षेत्रामध्ये शांतता हवी आहे. तसेच अफगाणिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा बनू नये अशीही इच्छा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT