अफगाणिस्तान पुन्हा हादरलं, कंधारमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात 62 जणांचा मृत्यू

कंधार येथील शिया मशिदीत नमाज पठण करणाऱ्या लोकांवर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे (Kandahar Blast).
Blast in mosque 62 people killed in Kandahar blast at Afghanistan
Blast in mosque 62 people killed in Kandahar blast at AfghanistanDainik Gomantak

अफगाणिस्तानात (Afghanistan) राहणारे शिया समुदाय (Shia Islam) या शुक्रवारीही शोकसागरात बुडाले आहेत. कारण मागील झालेल्या शुक्रवार प्रमाणेच या शुक्रवारी देखील देशातील दुसरे सर्वात मोठे शहर कंधार येथील शिया मशिदीत नमाज पठण करणाऱ्या लोकांवर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे (Kandahar Blast). या हल्ल्यात 62 लोक ठार झाले आहेत तर 68 जण जखमी झाले आहेत . इस्लामिक स्टेटने (Islamic State) या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, त्याच संघटनेच्या आत्मघाती बॉम्बरने कुंदुज (Kunduz blast) शहरातील शिया मशिदीत 80 हून अधिक जणांचा बळी घेतला होता .(62 people killed in Kandahar blast at Afghanistan)

घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, आत्मघाती हल्लेखोराने प्रार्थना सुरू असतानाच आल्यानंतर स्वतःला उडवले. यामुळे, अधिक लोक मरण पावले आणि जखमी झाले. स्फोटानंतर इमाम बरगाह मशिदीच्या आतून इंटरनेट मीडियावर पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ त्रासदायक आहेत. स्फोटानंतर, जमीन आणि भिंती रक्ताने माखल्या गेल्या, शरीराचे मांस तुकडे झाले आणि सर्वत्र विखुरले गेले.

हा स्फोट इतका भयानक होता की स्फोटामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे, ज्या सभागृहामध्ये प्रार्थना केली जात होती त्या सभागृहाच्या भिंती धुरामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या पडल्या होत्या. स्फोटाच्या काही तासांनंतरही मशिदीच्या परिसरात गनपाऊडरचा वास जाणवत होता. तालिबान सरकारची वृत्तसंस्था बख्तरने 62 लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानचे विशेष दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिसराला घेराव घालून लोकांची चौकशी सुरू केली आहे.

Blast in mosque 62 people killed in Kandahar blast at Afghanistan
हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्याक समजू नये: पंतप्रधान शेख हसीना

प्रशासनाने जखमींना उपचारासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. जरी तालिबानने शिया हजारा समुदायाला लक्ष्य केले असले तरी अलीकडचे हल्ले इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने केले आहेत. तालिबान आणि आयएस या सुन्नी मुस्लिमांच्या अतिरेकी संघटना आहेत. शिया लोकसंख्येचा सर्वात मोठा देश असलेल्या इराणने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. काबूलमधील इराणी दूतावासाने तालिबान्यांनी दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करावी अशी अपेक्षा केली आहे.

अलीकडेच कुंदुज शहरातील मशिदीच्या आत बॉम्बस्फोट झाला होता ज्यात 80 लोक ठार झाले होते आणि बरेच लोक जखमी देखील झाले होते. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती. काल झालेल्या स्फोटावेळी देखील परिसरातील शिया मुस्लिम मोठ्या संख्येने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मोठ्या बॉम्बस्फोटानंतर मशीद धूराने भरली होती. धूर साफ झाल्यानंतर आजूबाजूचे लोक मशिदीच्या आत पोहोचले तेव्हा लोकांचे विस्कटलेले मृतदेह पडलेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com