The Kashmir Files  Dainik Gomantak
ग्लोबल

USA मध्ये टॉप 10 मध्ये झळकला 'द काश्मीर फाईल्स'

अमेरिकेतही 'द काश्मीर फाईल्स'ने फडकवला झेंडा, 10 दिवसांत एवढ्या लाख डॉलर्सची कमाई

दैनिक गोमन्तक

द काश्मीर फाईल्स: देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने अमेरिकेतही खळबळ उडवली आहे. भारताप्रमाणेच तिथेही चित्रपटगृहांची संख्या चौपट वाढली असुन. या चित्रपटाच्या कमाईने तेथे दाखवल्या जाणाऱ्या सर्व इंग्रजी चित्रपटांना मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्याच्या शेवटी, चित्रपटाने यूएसए बॉक्स ऑफिसच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे. ('The Kashmir Files' movie hits top 10 in USA)

'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्चला अमेरिकेतही प्रदर्शित झाला. केवळ 63 चित्रपटगृहांमध्ये सुरू झालेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला सुमारे $400,000 कमाई करून प्रेक्षकांना थक्क केले. यानंतर चित्रपट दाखविणाऱ्या चित्रपटगृहांची संख्या वाढू लागली आणि शेवटचे वृत्त मिळेपर्यंत अमेरिकेत (America) 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट दाखविणाऱ्या चित्रपटगृहांची संख्या रविवारपर्यंत 230 वर गेली आहे. भारतातही हा चित्रपट केवळ 650 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता आणि आता त्यांची संख्या चार हजारांवर गेली आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय पाहत आहेत. यासाठी ऑफिसमध्ये ग्रुप बुकिंगही सुरू आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाच्या अमेरिकन कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात सुमारे 10 लाख डॉलर्सचा व्यवसाय केला आहे.

अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि झी स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक रंजन अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट काश्मीर (Kashmir) खोऱ्यातील स्थानिक काश्मिरी पंडितांच्या 32 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडाचे वास्तव उलगडून दाखवतो. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, प्रकाश बेलवाडी, मृणाल कुलकर्णी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT