Abu Ibrahim al-Qurashi Dainik Gomantak
ग्लोबल

''बदला घेणार''! ISIS ने युक्रेन युध्दाचा फायदा घेत...'

इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने रविवारी कमांडर अबू इब्राहिम अल-कुराशीच्या हत्येचा "बदला" घेण्याची शपथ घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. या युध्दात युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरांची रशियन सैन्यांकडून नासधूस करण्यात आली आहे. यातच आता दुसरीकडे, इस्लामिक स्टेट (Islamic State) या दहशतवादी संघटनेने रविवारी कमांडर अबू इब्राहिम अल-कुराशीच्या हत्येचा "बदला" घेण्याची शपथ घेतली आहे. या संघटनेने काही दहशतवाद्यांना युक्रेन (Ukraine) युद्धाचा फायदा घेऊन युरोपमध्ये (Europe) हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. अबू इब्राहिम अल-कुर्शी आणि गटाचा माजी कमांडरच्या मृत्यूबद्दल "आम्ही आल्लाह वर विश्वास ठेवून बदला घेण्याची मोहीम जाहीर करतो," असे इस्लामिक स्टेट गटाने म्हटले आहे. यासंबंधीचा ऑडिओ संदेश टेलिग्राम मेसेजिंग अ‍ॅपवर प्रसारित करण्यात आला आहे. (The Islamic State terrorist organization has vowed to avenge the killing of Commander Abu Ibrahim al-Qurashi)

दरम्यान, या दहशतवादी संघटनेचा नवा प्रवक्ता अबू-ओमर अल-मुहाज्जीरने, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या संदर्भात, "युरोपमध्ये एकमेकांशी लढणाऱ्या धर्मयुद्धांचा फायदा घेत" आपल्या समर्थकांना युरोपमध्ये पुन्हा हल्ले सुरु करण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊस आणि अमेरिकन संरक्षण अधिकार्‍यांनी या संबंधीचा अहवाल दिला आहे. काही महिन्यांपूर्वी या गटाचा पूर्वीचा नेता फेब्रुवारीच्या सुरुवातीला मरण पावला होता, जेव्हा अबू इब्राहिम अल-कुरशीने उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकेच्या हल्ल्यादरम्यान स्वतःता स्फोट घडवून आणला होता.

त्यानंतर, 10 मार्च रोजी इस्लामिक स्टेट गटाने अबू इब्राहिम अल-कुराशीच्या मृत्यूची पुष्टी केली. गटाच्या माजी प्रवक्त्यासह अबू हसन अल-हाश्मी अल-कुर्शी यांना नवीन नेता म्हणून नाव देण्यात आले. कुर्दिशांच्या नेतृत्वाखालील सैन्य आणि सीरियन सरकारी सैन्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी अशा तळांचा वापर केला आहे. इराकमध्ये जिहादी सातत्याने हल्ले करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT