Russia-Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: भारतीय दूतावास पुन्हा होणार कार्यरत

युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावास पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाचे काम थांबवावे लागले होते. परंतु भारतीय दूतावास पुन्हा आपले काम सुरु करणार आहे. दरम्यानच्या काळात भारतीय दूतावास पोलंडमधून तात्पुरते काम करत होते. भारतीय दूतावास पोलंडमध्ये हलवण्यात आल्याची माहिती भारत सरकारने यापूर्वी दिली होती. काही दिवसांनंतर, दूतावासाने युद्धग्रस्त युक्रेनमधील नागरिकांसाठी 24 तासांचा व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबर जारी केला होता.

दुसरीकडे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत बोलताना सांगितले की, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने जानेवारी 2022 मध्ये भारतीयांसाठी नोंदणी मोहीम सुरु केली. ज्याअंतर्गत सुमारे 20,000 भारतीयांनी नोंदणी केली.

ते पुढे म्हणाले, "बहुतेक भारतीय नागरिक हे युक्रेनियन विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी होते." ऑपरेशन गंगा अंतर्गत 18 देशांतील 147 लोकांना युक्रेनमधून बाहेर काढून भारतात आणण्यात आल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.

भारतीय दूतावासाने सांगितले की, 17 मे रोजी युक्रेनची राजधानी कीवमध्ये भारतीय दूतावास पुन्हा उघडण्यात येणार आहे. रशियन सैन्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे भारताला कीवमधील आपले दूतावास बंद करावे लागले होते. रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध अद्याप संपलेले नाही, परंतु युक्रेनच्या लष्कराने रशियाला (Russia) राजधानी कीववर (Kyiv) अद्याप ताबा मिळू दिलेला नाही. रशियन सैन्य आता युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेकडील भागात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

Goa Illegal Dance Bars: बेकायदा डान्‍स बारमुळे गोवा बँकाॅकच्या दिशेने, वेश्‍‍या व्‍यवसायाला प्रोत्‍साहन- अरुण पांडे

ZP Election: रविवार ठरला प्रचाराचा वार, अखेरचे 4 दिवस रंगणार रणधुमाळी; भाजपकडून मुख्‍यमंत्री, दामू, विश्‍‍वजीत, तर 'आप'कडून केजरीवाल मैदानात

Horoscope: यश आणि प्रगतीचा दिवस! 'या' राशींची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

SCROLL FOR NEXT