Queen Elizabeth II
Queen Elizabeth II Dainik Gomantak
ग्लोबल

Queen Elizabeth II यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार

दैनिक गोमन्तक

Queen Elizabeth II Death: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. 19 सप्टेंबर रोजी त्यांच्या अंत्यसंस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराणी एलिझाबेथ II यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी मेफेअर, लंडन येथे झाला होता. त्या किंग जॉर्ज सहावे आणि राणी एलिझाबेथ यांची पहिली मुलगी होत्या.

त्याचवेळी, ब्रिटनच्या (Britain) राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मध्य लंडनमध्ये तोफांची सलामी देण्यात येणार आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे सुपुत्र चार्ल्स तिसरे आणि त्यांची पत्नी कॅमिला बालमोरल येथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर आज लंडनला (London) रवाना होतील. शुक्रवार हा राष्ट्रीय शोकाचा पहिला दिवस असेल. स्कॉटलंडमधील (Scotland) बालमोरल कॅसल येथे गुरुवारी राणीचे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या.

दुसरीकडे, विंडसर कोर्ट येथे महाराणी एलिझाबेथ II यांचा राज्याभिषेक सोहळा 1953 मध्ये झाला होता. ब्रिटिश सिंहासन धारण करणाऱ्या त्या सहाव्या महिला होत्या. 2 जून 1953 रोजी राणी एलिझाबेथ सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या.

दरम्यान, राणी एलिझाबेथ द्वितीय गेल्या ऑक्टोबरपासून आजारी होत्या. त्यांना ना चालता येत होतं ना उभं राहता येत होतं. आजारपणामुळे त्यांनी अलीकडच्या काळात प्रवासही टाळला होता. महाराणी एलिझाबेथ यांच्या पश्चात प्रिन्स चार्ल्स राजा होतील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या कार्यकाळात तीन वेळा भारताला भेट दिली होती. 1961, 1983 आणि 1997 मध्ये त्या भारत (India) दौऱ्यावर आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT