Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान यांच्यावर पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तोशा खाना प्रकरणात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) दोषी असून, इम्रान खान यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. इम्रान खान यांनी सत्तेत असताना मिळालेल्या भेटवस्तूंबाबत अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

(The Election Commission of Pakistan (ECP) disqualified PTI chief Imran Khan for five years)

"पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. आम्ही या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत." असे इम्रान खानचे वकील गौहर खान यांनी म्हटले आहे. तोशाखाना प्रकरणी 19 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या संदर्भात निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्यासह सर्व पक्षांना नोटीस बजावली होती.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ सरकार कोसळल्यानंतर, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष, राजा परवेझ अश्रफ यांनी निवडणूक आयोगाला या प्रकरणाचा विचार करण्याची विनंती केली होती.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे नेते बॅरिस्टर मोहसीन नवाझ राझा यांनी घटनेच्या कलम 63 (2) अंतर्गत इम्रान खान यांच्याविरोधात राष्ट्रीय असेंब्लीच्या अध्यक्षांसमोर हे प्रकरण मांडले होते. पंतप्रधानपदावर असताना इम्रान खान यांना भेटवस्तू मिळाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

US Iran War Timeline: सुप्रीम लीडरचा अंत, 4000 मृत्यू अन् 90 हजार घरांची राखरांगोळी! अमेरिका-इराण युद्धाच्या टाइमलाइनचा थरारक पट; 40 दिवसांनी रक्तरंजित संघर्षाला ब्रेक

SCROLL FOR NEXT