Liz Truss Resigns: लिझ ट्रस यांनी राजीनामा देऊन मोडला विक्रम, वाचा सविस्तर

Liz Truss: लिझ ट्रस यांनी तब्बल 45 दिवसांनंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
Liz Truss
Liz Truss Twitter

British PM Liz Truss Resigns: लिझ ट्रस यांनी तब्बल 45 दिवसांनंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर ब्रिटनच्या इतिहासामध्ये नवी नोंद झाली आहे. आपल्या आयुष्यातील शेवटचे 119 दिवस पंतप्रधान म्हणून काम केल्यानंतर पदावर असताना निधन झालेल्या जॉर्ज कॅनिंग यांचा 1827 पासूनचा विक्रम ट्रस यांनी मोडला आहे.

दरम्यान, ब्रिटनमधील (Britain) सध्याच्या राजकारणाप्रमाणे, जिथे ऋषी सुनक (Rishi Sunak) पुन्हा एकदा ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आहेत. विशेष म्हणजे, जॉर्ज कॅनिंग यांचे देखील भारतीय कनेक्शन होते. त्यांच्या चार मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा, चार्ल्स जॉन कॅनिंग हा ब्रिटिश गव्हर्नर-जनरल होता, ज्याने 1857 चे बंड मोडून काढले होते. त्यानंतर ते भारताचे पहिले ब्रिटिश व्हाईसरॉय बनले. पण प्रथम मोठा कॅनिंग, ज्याचा विक्रम नुकताच लिझ ट्रस यांनी मोडला. ते एका अँग्लो-आयरिश गृहस्थाचा मुलगा होता, ज्याने जॉर्ज कॅनिंग एक वर्षाचा असताना आपल्या कुटुंबाचा त्याग केला होता.

Liz Truss
Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

तथापि, जॉर्ज कॅनिंग एक तल्लक बुध्दीचे व्यक्ती होते. त्यांचे पालनपोषण आणि शिक्षण त्यांच्या काकांनी केले. कॅनिंग यांना हायड अ‍ॅबी स्कूल, इटन कॉलेज आणि क्राइस्ट चर्च कॉलेज, ऑक्सफर्ड यासारख्या उच्चभ्रू संस्थांमधून शिक्षण घेता आले.

दुसरीकडे, पिट यांच्या पाठिंब्याने, कॅनिंग खासदार बनले होते. तर 12 एप्रिल 1827 रोजी पंतप्रधान होण्यापूर्वी, त्यांनी अनेक राजनैतिक आणि कॅबिनेट पदे भूषवली. जेव्हा कॅनिंग पंतप्रधान बनले तेव्हा अभिनेत्रीचा मुलगा 'पंतप्रधान' होण्यासाठी अयोग्य आहे, अशी वक्तव्येही विरोधकांकडून करण्यात आली होती.

Liz Truss
Liz Truss UK PM: कोण आहेत लिझ ट्रस; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

तरीही, जॉर्ज कॅनिंग यांना जॉर्ज-4 ने पंतप्रधान होण्यासाठी आमंत्रित केले होते, परंतु त्यांची तब्येत सतत खालावत गेली आणि 119 दिवस पदावर राहिल्यानंतर 8 ऑगस्ट 1827 रोजी त्यांचे निधन झाले. कॅनिंग यांचा मुलगा चार्ल्स 15 वर्षांचा होता जेव्हा त्याचे वडील मरण पावले. त्यानंतर चार्ल्स यांनी 1833 मध्ये क्राइस्ट चर्च कॉलेज, ऑक्सफर्डमधून गणितात पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे, तीन वर्षांनी ते खासदारही झाले.

Liz Truss
UK PM New Liz Truss: ऋषी सुनक यांचा पराभव करुन लिझ ट्रस बनल्या ब्रिटनच्या पंतप्रधान

तसेच, चार्ल्स कॅनिंग यांनी 1841 मध्ये आपल्या वडिलांचे विरोधक सर रॉबर्ट पील यांच्या सरकारमध्ये (Government) अंडर-सेक्रेटरी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते वुड्स आणि फॉरेस्टचे पहिले आयुक्त, ब्रिटिश म्युझियमवरील रॉयल कमिशनचे सदस्य आणि पोस्टमास्टर जनरल- 1856 मध्ये त्यांना भारतात (India) पाठवले जाईपर्यंत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com