The decision to withdraw troops from Afghanistan is the right one: Joe Biden Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय योग्यच:जो बायडन

काबूलमधून (Kabul) अमेरिकन सैन्याच्या (US Army) संपूर्ण माघारीनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना हे स्पष्टीकरण दिले आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकनांना (USA) अफगाणिस्तान (Afghanistan) सोडण्याची कोणतीही मुदत नाही. जे तिथे राहिले आहेत आणि येऊ इच्छितात ते येऊ शकतात. त्यांच्या आगमनाला कोणताही अडथळा नाही. काबूलमधून (Kabul) अमेरिकन सैन्याच्या (US Army) संपूर्ण माघारीनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना हे स्पष्टीकरण दिले आहे.

अफगाणिस्तानातील लोकांना बाहेर काढणे अभूतपूर्व असल्याचे सांगताना बायडन म्हणाले की काबूल सोडण्याशिवाय पर्याय नाही तसेच अफगाणिस्तानमध्ये 100 ते 200 अमेरिकन शिल्लक असल्याचा अंदाज आहे. ज्यांना यामधून यायचे आहे त्यांनाही परत आणले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.(The decision to withdraw troops from Afghanistan is the right one: Joe Biden)

सैन्य माघारीचा निर्णय योग्यच

अफगाणिस्तानमध्ये आम्ही जे केलं ते गौरवशाली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानात जे केले ते विसरता येणार नाही. अमेरिकेच्या उपस्थितीत अफगाणिस्तानात बराच काळ शांतता होती. अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. आमचे मिशन यशस्वी झाले. आम्ही इतर देशांचे मुत्सद्दी आणि नागरिकांनाही बाहेर काढले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून 1.25 दशलक्षाहून अधिक लोकांना बाहेर काढले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानमधील मोहिम यशस्वी ठरली. अफगाणिस्तानमधून परतण्याचा निर्णयही योग्यच असल्याचं मला वाटतेय. अफगाणिस्तानमधील युद्ध आता संपले आहे.

त्याचबरोबर मी हे कायमचे युद्ध वाढवणार नव्हतो तसेच मी कायमचे बाहेर देखील पडणार नाही. आता हे युद्ध संपवण्याची वेळ आली आहे असे मतही त्यांनी मांडेल आहे.

अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीने या विषयवार बोलताना बायडन यांनी यांनी प्रत्येक अमेरिकनला देशातून काढून टाकल्याशिवाय माघार न घेता 31 ऑगस्टची मुदत वाढवायला हवी होती.असे मत मांडले आहे पण बायडन यांच्या मते ही मुदत नागरिकांसादातही नसून ती फक्त सैन्यासाठी होती असे स्पष्ट केले आहे.

तसेच बायडन यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन लोकांचा जीव वाचवण्यासाठी ही अंतिम मुदत आखण्यात आली होती जर तालिबानमध्ये सैन्य कायम राहिले असते तर अमेरिकेची या नव्या लढाईत अतिरिक्त जीवितहानी झाली असती.

अराजकतेला अशरफ घनीच कारणीभूत -

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेल्यानंतर काबूलमध्ये अराजक माजले आहे. अमेरिकन हितासाठी आम्हाला अफगाणिस्तान सोडावे लागले. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातून येऊ इच्छिणाऱ्या 90 टक्के अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. जे शिल्लक आहेत त्यांनाही बाहेर काढले जाईल. ते म्हणाले, 31 ऑगस्टपर्यंतची मुदत सैन्य माघारीची असून ती नागरिकांची नाही.

बायडन यांचा दहशतवाद्यांना इशारा -

ज्यांना अमेरिकेला हानी पोहचवायची आहे किंवा जे आमच्या किंवा मित्रराष्ट्रांच्या विरोधात दहशतवादात गुंतले आहेत त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कधीही शांत बसणार नाही. आम्ही क्षमा करणार नाही, आम्ही विसरणार नाही.तुमचा शोध घेऊन तुम्हाला अंतिम किंमत मोजावीच लागेल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT