Thailand Train Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Train Accident: काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालत्या ट्रेनवर कोसळले क्रेन, 22 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु VIDEO

Thailand Train Accident: थायलंडच्या उत्तर-पूर्व भागात बुधवारी (14 जानेवारी) सकाळी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला.

Manish Jadhav

Thailand Train Accident: थायलंडच्या उत्तर-पूर्व भागात बुधवारी (14 जानेवारी) सकाळी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. राजधानी बँकॉकहून उबोन रत्चाथानीकडे जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनवर बांधकामासाठी वापरले जाणारे अवजड क्रेन कोसळले. या भीषण अपघातात रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले. आतापर्यंत या अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना कशी घडली?

दरम्यान, हा अपघात (Accident) बुधवारी सकाळी बँकॉकपासून 230 किमी (143 मैल) अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखियो जिल्ह्यात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरु होते. ट्रेन रुळावरुन जात असताना अचानक बांधकाम साइटवरील एक महाकाय क्रेन रेल्वेच्या डब्यावर कोसळले. क्रेनचा आघात इतका जोरदार होता की, ट्रेनचे डबे रुळावरुन खाली घसरले गेले. एवढचं नाहीतर धडकेनंतर रेल्वेच्या डब्यांना थोड्या काळासाठी आगही लागली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली, मात्र मलब्याखाली अनेक प्रवासी अडकल्याने परिस्थिती गंभीर आहे.

डब्यांचा झाला चुराडा

क्रेन इतक्या जोरात आदळले की, रेल्वेचा लोखंडी सांगाडा पूर्णपणे मुडपला गेला असून खिडक्यांच्या काचा फुटून सर्वत्र विखुरल्या आहेत. अनेक प्रवासी या मोडकळीस आलेल्या सांगाड्यामध्ये अडकून पडले आहेत. वैद्यकीय पथके आणि बचावकर्ते गॅस कटर व इतर अवजड उपकरणांच्या साहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. क्रेन आणि ट्रेनचे भाग एकमेकांत घट्ट अडकल्यामुळे हे ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रेल्वे प्रशासन आणि सरकारची भूमिका

थायलंड (Thailand) रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ज्या डब्यावर क्रेन कोसळली त्या डब्यात आसन व्यवस्थेनुसार 195 प्रवासी होते. मात्र, प्रवाशांची नेमकी संख्या यापेक्षा वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघाताची माहिती मिळताच थायलंडचे उपपंतप्रधान आणि परिवहन मंत्र्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला असून या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुरक्षा नियमांचा अभाव पुन्हा एकदा चर्चेत

थायलंडमध्ये औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रातील अपघात हे नवीन नाहीत. याआधीही अनेकवेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अशा प्रकारचे भीषण अपघात घडले आहेत. मात्र हाय-स्पीड रेल्वेसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामात इतकी मोठी निष्काळजी कशी झाली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीचा राजकोटमध्ये धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला 17 वर्षांचा रेकॉर्ड; न्यूझीलंडविरुद्ध बनला भारताचा 'रनमशीन' VIDEO

Goa Assembly Session: मंत्रिमंडळ निर्णयांच्या गोपनीयतेवरून विधानसभेत रणकंदन; 16 जानेवारीला चर्चेची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Crime News: प्रेम, धोका अन् टोकाचं पाऊल! 21 वर्षीय एअर होस्टेसनं संपवलं जीवन; लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Winter Session 2026: गोव्याची हवा विषारी झाली! पणजी, पर्वरीसह प्रमुख शहरांत प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी; हवेच्या गुणवत्तेवरुन युरींचा सरकारला जाब

ICC Rankings: किंग कोहलीचं 'विराट' पुनरागमन! 1403 दिवसांनंतर पुन्हा बनला जगातील नंबर 1 फलंदाज; हिटमॅनला फटका

SCROLL FOR NEXT