Thailand Cambodia Conflict  Dainik Gomantak
ग्लोबल

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Thailand Cambodia War: थायलंड व कंबोडियामधील सीमेवरील संघर्ष शनिवारी तिसऱ्या दिवशी सुरू होता. दोन्ही देशांमधील हिंसाचारातील मृतांचा आकडा ३२ वर पोचला आहे.

Sameer Panditrao

सुरिन: थायलंड व कंबोडियामधील सीमेवरील संघर्ष शनिवारी तिसऱ्या दिवशी सुरू होता. दोन्ही देशांमधील हिंसाचारातील मृतांचा आकडा ३२ वर पोचला आहे. थायलंडशी झालेल्या संघर्षात १२ जणांचा मृत्यू झाला. यात दोन्ही बाजूंच्या मृतांची संख्या ३२ झाली.

सीमेवरील हजारो लोकांवर घर सोडण्याची वेळ आली. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीने रात्री उशिरा न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक घेतली. सुरक्षा समितीने अधिकृत निवेदन जाहीर केले नसले तरी सर्व १५ सदस्य देशांनी तणाव कमी करण्याचे, संयम दाखवण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय नागरिकांना सूचना

थायलंड आणि कंबोडियामधील संघर्षादरम्यान भारताने देशवासींना सावधानतेचा इशारा दिला आहे. कंबोडियातील भारतीय दूतावासाने आज मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ‘कंबोडिया-थायलंड सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना सीमा भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे,’ असे येथील दूतावासाने ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे.सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

५८ हजार लोकांचे स्थलांतर

थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ५८ हजार लोकांनी सीमेनजीकच्या गावांमधून स्थलांतर केले आहे. कंबोडियाच्या दाव्यानुसार २३ हजारपेक्षा जास्त लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत.तणावामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मंदिराजवळ स्फोट होऊ लागले असून गावांमध्ये ग्रामस्थांनी तंबूत आसरा घेतला आहे.

शस्त्रसंधीचे कंबोडियाचे आवाहन

कंबोडियाने ‘यूएन’च्या माध्यमातून शस्त्रसंधी करण्याचे आवाहन केले आहे. कंबोडियाचे ‘यूएन’मधील राजदूत चेया कियो म्हणाले, की हिंसाचार त्वरित थांबावा, शांततेने हा वाद सुटावा, असे आम्हाला वाटते. मात्र थायलंडने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कंबोडियाने थायलंडवर हल्ला केल्याच्या आरोपांना उत्तर देताना ‘हवाई दल नसलेला एक छोटा देश त्याच्या तिप्पट सैन्यासह खूप मोठ्या देशावर कसा हल्ला करू शकतो?’ असा सवाल केला. दरम्यान, सुरक्षा समितीने दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. थायलंडचे ‘यूएन’मधील राजदूत पत्रकारांशी न बोलता बैठकीतून निघून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोव्यासाठी पोस्टाचं वेगळं सर्कल करा, गोमंतकीयांनाच पोस्टमन म्हणून संधी द्या'; सरदेसाईंचे ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र

गर्दीला करा बाय! मुंबई ते कोकण प्रवास आता फक्त 3 तास, 'या' दिवशीपासून सुरू होणार Ro-Ro Ferry सेवा

Goa Live Updates: पोर्तुगीजकालीन वालशे पुल दुसऱ्यांदा पाण्याखाली

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Horoscope: करिअर, प्रेमात मिळणार यश! 'या' मूलांकांच्या व्यक्तींना 'सप्टेंबर' ठरणार भाग्यशाली

SCROLL FOR NEXT