Terrorist Attack Dainik Gomantak
ग्लोबल

नायजर आर्मीवर दहशतवादी हल्ला; 15 सैन्यांचा मृत्यू अनेक जण बेपत्ता

पश्चिम आफ्रिकेतील (West Africa) नायजरमध्ये (Niger) लष्कराच्या पुरवठा मिशनवर दहशतवादी हल्ला झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम आफ्रिकेतील (West Africa) नायजरमध्ये (Niger) लष्कराच्या पुरवठा मिशनवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 15 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर सातहून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. नायजरच्या संरक्षण मंत्रालयानेही (Ministry of Defense of Niger) सोमवारी सांगितले की, किमान सहा सैनिक बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला शनिवारी टिलबेरी परिसरातील (Tilberry Area) तोरोडी भागात झाला.

त्यावेळी सिक्युरिटी बोनीपर्यंत माल माल पोहोचविण्यात येत होता. मंत्रालयाने सांगितले की, सशस्त्र हल्लेखोरांनी सैनिकांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या जखमी झालेल्या साथीदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु चकमकीदरम्यान, त्यांचा हा साथीदार आयईडीवर (IED) पडला, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आणि सात जखमी झाले.

नायजर लष्करांची शोधमोहीम सुरु

नायजरच्या सुरक्षा दलाने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी विमानातून शोधमोहीम राबवली जात आहे. या भागातील जिहादी संघटना इसिस (इस्लामिक स्टेट) आणि अल कायदाशी संबंधित आहेत. हे हल्लेखोर माली आणि बुर्किना फासोच्या सीमावर्ती भागात हल्ले करत राहतात.

नायजरमध्ये दहशतवादी

नायजरमध्ये जिहादींची उघड दहशत आहे. दिवसेंदिवस सुरक्षा दल आणि सामान्य लोक त्यांच्या क्रूरतेचे बळी ठरत आहेत. मार्च महिन्यात दहशतवाद्यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर सुमारे 30 मिनिटे गोळीबार केला होता. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा दोन दिवसांनी मोहम्मद बझौम राष्ट्रपती पदाची शपथ घेणार होते.

याच्या एक आठवडा आधी बंदूकधारी दहशतवाद्यांनी सामान्य लोकांवर हल्ला केला होता. मोटारसायकलवरुन आलेल्या बंदूकधारी गावांमध्ये घुसले आणि त्यांनी लोकांना त्यांच्या घराबाहेर काढत त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 137 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सरकारने या हल्ल्याला अलीकडच्या काळातील सर्वात भयानक घटना असेही म्हटले होते. जानेवारी महिन्यातही दहशतवाद्यांच्या अशाच हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT