Terrorist Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorist Attack: मुंबईतील ताज हॉटेलमधील 26/11 ची पुनरावृत्ती सोमालियात...

सोमालियातील मोहादिशु येथे 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला आहे.

दैनिक गोमन्तक

सोमालिया दहशतवादी हल्ला: सोमालियातील मोगादिशू येथे 26/11सारखा दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने हयात हॉटेलमध्ये घुसून गोळीबार आणि स्फोटक हल्ले केले. 14 तास उलटल्यानंतर आता ऑपरेशन संपले आहे. ताज्या अपडेटनुसार हॉटेलमध्ये सध्या कोणीही दहशतवादी नाही.

(Terrorist attack in Somalia like Taj Hotel in Mumbai)

हॉटेलमध्ये उपस्थित असलेले सर्व दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ओलीस ठेवलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मोहादिशु येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये हॉटेल हयातचे मालक अब्दिरहमान इमान यांच्यासह दोन व्यावसायिकांचा समावेश आहे. हा दहशतवादी हल्ला समोर आल्याने याला 26/11 चा मुंबई हल्ला असे म्हटले जात आहे.

मोहादिशू येथील हयात हॉटेलवरील दहशतवादी हल्ला हा 26/11 च्या हल्ल्यासारखा कसा आहे हे समजून घेऊया...

  • मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ला करणारे फिदाईन होते आणि आज हयात हॉटेलवर हल्ला करणारेही फिदाईन आहेत. ते मरण्यासाठीही हा हल्ला करण्यासाठी आले आहेत.

  • मुंबईतील ताज हॉटेल 7 स्टार होते. मोहादिशूचे हयात हॉटेल देखील 7 स्टार आहे.

  • दोन्ही हल्ल्यांमध्ये स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.

  • अनेक तास हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी पुरेशी शस्त्रे आणि दारूगोळा आणला आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळीही तेच पाहायला मिळाले.

  • दोन्ही हल्ल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकाला ओलीस ठेवण्यात आले होते.

  • हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांनी छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली होती

  • दोन्ही हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले

हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे, ज्यांची ओळख सोशल मीडिया पोस्टमध्ये झाली आहे. मोगादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद यांच्यासह दोन सुरक्षा अधिकारी सुरक्षा दल आणि जिहादी गटातील लढवय्ये यांच्यातील चकमकीत जखमी झाले, असे पोलीस मेजर हसन दाहीर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT