Pakistan Army Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorist Attack: पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला, तीन जवानांसह एक दहशतवादी ठार

Terrorist Attack: पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. बलुचिस्तान प्रांतातील जरघून भागात शनिवारी पुन्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केला.

Manish Jadhav

Terrorist Attack: पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. बलुचिस्तान प्रांतातील जरघून भागात शनिवारी पुन्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केला.

या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे तीन जवान शहीद झाले असून प्रत्युत्तरादाखल एका दहशतवाद्याचाही खात्मा झाला आहे.

पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने एका निवेदनात म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी (Terrorists) या भागातील कोळसा खाणींवर खंडणीचे प्रयत्न रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या एका चौकीला लक्ष्य केले.

निवेदनानुसार, सुरक्षा दलांनीही गोळीबार करुन प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून एक दहशतवादीही मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

ISPR ने सांगितले की, जरघूनच्या डोंगराळ भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आयएसपीआरचे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी अलीकडेच सांगितले होते की, गेल्या एका वर्षात 436 दहशतवादी हल्ल्यांमध्ये किमान 293 लोक मारले गेले आणि 521 जण जखमी झाले.

दुसरीकडे, या काळात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये एकूण 137 सुरक्षा जवान शहीद आणि 117 जण जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये (Pakistan) दहशतवादी हल्ले वाढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT