Pakistan Army Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorist Attack: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; 11 सैनिक मृत्यूमुखी

दैनिक गोमन्तक

Terrorist Attack in Pakistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या चित्राल जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला आहे. या मध्ये ११ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

तर ४० सैनिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार, हा हल्ला तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून केला गेल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रातांच्या चित्राल जिल्ह्यात बॉर्डरवरील दोन चौकीवर हा हल्ला करण्यात आला आहे.

ISPR ने म्हटल्यानुसार, 'आधुनिक शस्त्रांनी सज्ज दहशतवाद्यांच्या एका मोठ्या गटाने चित्राल जिल्ह्यातील कलश भागात अफगाणिस्तान सीमेजवळ असलेल्या दोन सैन्य चौक्यांवर हल्ला केला.

या चकमकीत 12 दहशतवादी मारले गेले, तर मोठ्या संख्येने दहशतवादी गंभीर जखमी झाले. द खोरासान डायरीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी तालिबानच्या प्रवक्त्याने आणि एका प्रमुख कमांडरने दावा केला की मोठ्या संख्येने टीटीपीच्या सैनिकांनी चित्रालमधील सीमा चौकीवर हल्ला केला आहे.

चित्राल जिल्हा अफगाणिस्तानातील कुनार, नूरिस्तान आणि बदख्शान प्रांतांना जोडतो. टीटीपी कमांडरने पुढे सांगितले की त्यांनी चित्राल जिल्ह्यात कारवाया सुरू केल्या आहेत. अनेक गावे ताब्यात घेतली आहेत.

बुधवारी पहाटे चार वाजता त्याची सुरुवात झाली. याच रिपोर्टमध्ये पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्याचे वक्तव्य शेअर करण्यात आले होते, त्यानुसार जेव्हा हल्ला झाला तेव्हा अफगाण सीमेवरून गोळीबारही झाला होता.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाला होता. यानंतर काही वेळातच पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बुधवारी दोन्ही देशांच्या सीमेवरील एक प्रमुख ट्रान्झिट पॉइंट बंद केला. या घटनेकडे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याचे संकेत मानले जात आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तोरखम या शहराचे अधिकारी नसरुल्ला खान यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच दोन्ही बाजूंच्या सीमा रक्षकांमध्ये गोळीबाराचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान, पाकिस्तानवर नेहमीच दहशतवाद्यांना आपल्या देशात स्थान दिल्याचे आरोप होताना दिसतात. दहशतवादावरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने वाद होतात.

मात्र आता पाकिस्तानमध्येच दहशतवादामुळे अस्थिरता दिसून येत आहे. आता पाकिस्तान यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT