Ayman Al Zawahiri  Dainik Gomantak
ग्लोबल

Ayman Al Zawahiri: 'हल्ला होऊ शकतो...', जवाहिरीच्या मृत्यूनंतर America ने दिला इशारा

Ayman al-Zawahiri Killed: 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेननंतर अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीचाही खात्मा करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

9/11 Attacks: 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेननंतर अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीचाही खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राला संबोधित करताना याची पुष्टी केली. अमेरिकेने काबूलमधील त्याच्या घरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू झाला. अल कायदाच्या प्रमुखाचा खात्मा केल्यानंतर आता अमेरिकेने आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटला मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात राहणाऱ्या अमेरिकन लोकांना लक्ष्य केले जाऊ शकते.

दरम्यान, काबूलमध्ये रविवारी अमेरिकेच्या ड्रोनने अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीला (Ayman Al Zawahiri) ठार केले. जवाहिरीवर 9/11च्या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप होता. या हल्ल्यात सुमारे 3,000 लोक मारले गेले. यापूर्वी 2011 मध्ये अमेरिकेने (America) ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) खात्मा केला होता.

दुसरीकडे, मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी जवाहिरीच्या हत्येला दुजोरा दिला. आता अमेरिकेला आपल्या नागरिकांवर हल्ले होण्याची भीती आहे. अमेरिकेला मिळालेल्या माहितीनुसार, जगभरातील अमेरिकन नागरिकांना अल कायदा किंवा त्यांच्याशी संलग्न दहशतवादी (Terrorist) संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाऊ शकते. 31 जुलै 2022 रोजी जवाहिरीची हत्या झाल्यामुळे अमेरिकाविरोधी हिंसाचाराची शक्यता जास्त आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे मत आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, "सध्याच्या माहितीवरुन असे सूचित होते की, दहशतवादी संघटना जगभरातील अनेक भागात अमेरिकेन नागरिकांवर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत आहेत. या हल्ल्यांमध्ये आत्मघाती कारवाया, हत्या, अपहरण यांचा समावेश आहे."

शिवाय, अलर्टमध्ये म्हटले आहे की, 'यूएस नागरिकांनी "परदेशात प्रवास करताना सतर्कता आणि जागरुकता राखणे आवश्यक आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT