Pakistan CJP Saqib Nisar Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: माजी सरन्यायाधीशांच्या घरावर दहशतवादी हल्ला! दोन पोलीस जखमी; शरीफ यांना ठरवले होते अपात्र

Pakistan CJP Saqib Nisar: पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, माजी सरन्यायाधीशांच्या घरावर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले.

Manish Jadhav

Terror Attack In Pakistan CJP Saqib Nisar House: पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश (CJP) साकिब निसार यांच्या लाहोर येथील निवासस्थानावर दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, माजी सरन्यायाधीशांच्या घरावर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. पाक मीडिया चॅनेलनुसार, सीजेपी यांच्या कारचे स्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे. निसार आणि त्यांचे कुटुंबीय या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पोलिस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला किंवा परदेशी कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सरन्यायाधीश निसार यांनी 2017 मध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र ठरवले होते.

दरम्यान, साकिब निसार यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या घटनेने पंजाब पोलिसांची झोप उडाली आहे. एका निवेदनात, पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, प्रांतीय पोलिस प्रमुख उस्मान अन्वर यांनी या घटनेची दखल घेतली आणि लाहोर पोलिस अधिकाऱ्याकडून अहवाल मागवला. जखमी पोलिसांवर उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पंजाब पोलिसांनी सांगितले की, "माजी मुख्य न्यायाधीशांचे कुटुंबीय पूर्णपणे सुरक्षित आहेत. आयजींनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.''

दरम्यान, कॉन्स्टेबल आमिर आणि खुर्रम यांना किरकोळ दुखापत झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. प्रांतीय आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी एका निवेदनात सांगितले की, बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले आणि जखमींवर उपचार करण्यात आले.

दहशतवादी हल्ला किंवा परदेशी कट असल्याचा संशय

पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, "प्राथमिक तपासानुसार, देशात भीती आणि दहशत पसरवण्याचा आमच्या शत्रूंचा हा दुर्भावनापूर्ण प्रयत्न आहे." डॉनच्या मते, या हल्ल्यामागे परदेशी षड्यंत्र असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या घटनेत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही आणि पुरावे तपासले जात असून लवकरच दोषींचा शोध घेतला जाईल.

शरीफ यांना अपात्र ठरवण्यात आले

डॉनच्या वृत्तानुसार, न्यायधीश निसार यांची 18 फेब्रुवारी 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ते लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 2017 मध्ये त्यांनी नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT