Pakistan: लतीफ, कुद्ददूस, कैसर आणि आता 'रहिमुल्ला'; भारतविरोधी दहशतवादी पाकिस्तानात होतायेत ढेर!

Maulana Rahimullah Tariq Shot Dead In Pakistan: भारताचे शत्रू पाकिस्तानमध्ये एक एक करुन मारले जात आहेत.
Maulana Rahimullah Tariq Shot Dead In Pakistan
Maulana Rahimullah Tariq Shot Dead In PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Maulana Rahimullah Tariq Shot Dead In Pakistan: भारताचे शत्रू पाकिस्तानमध्ये एक एक करुन मारले जात आहेत. ताज्या घटनेत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा मानला जाणारा मौलाना रहीमुल्ला तारिक मारला गेला आहे. मौलाना भारताविरुद्धच्या रॅलीत गरळ ओकत होता, त्याचवेळी काही अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

मौलाना रहिमुल्ला रॅलीला संबोधित करताना मारला गेला

मौलाना रहीमुल्लाह मसूद अझहरचा जवळचा असून त्याने अनेकदा भारतविरोधात वक्तव्ये केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीच्या ओरंगी टाऊनमध्ये एका रॅलीला संबोधित करताना तो मारला गेला. पाकिस्तानमध्ये (Pakistan) या वर्षाच्या सुरुवातीपासूनच टार्गेट किलिंग सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 12 दहशतवाद्यांना अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले आहे.

Maulana Rahimullah Tariq Shot Dead In Pakistan
Pakistan: दिवाळीच्या मुहुर्तावर पाकिस्तानच्या तुरुंगातून 80 भारतीय मच्छिमारांची सुटका, तब्बल 3 वर्षांनंतर...

भारतविरोधी रॅलीत सहभागी होण्यापूर्वी अज्ञातांनी हल्ला केला

दरम्यान या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कराचीच्या ओरंगी टाऊनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतविरोधी रॅलीमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी मौलाना रहिमुल्ला हा देखील या रॅलीत सहभागी झाला होता.

यादरम्यानच अचानक अज्ञात हल्लेखोरांनी रहिमुल्ला याच्यावर गोळीबार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी (Police) सांगितले की, 'गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मौलाना रहीमुल्ला तारिक असे आहे.

तो एका धार्मिक रॅलीत सहभागी झाला होता, त्याचवेळी अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला.' ही टार्गेट किलिंग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Maulana Rahimullah Tariq Shot Dead In Pakistan
Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर दहशतवादी हल्ला, 3 अतिरेकी ठार, 3 विमाने जाळून खाक

यावर्षी आतापर्यंत 12 दहशतवादी ठार

पाकिस्तानात टार्गेट किलिंगचे सत्र सुरु झाले आहे. यावर्षी आतापर्यंत 12 दहशतवादी मारले गेले आहेत. योगायोग असा की, या सर्वांनी भारताविरुद्ध गरळ ओकली होती किंवा ते दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते. या महिन्यातील अशा प्रकारची ही तिसरी हत्या आहे. 10 नोव्हेंबरला अक्रम गाजी मारला गेला तर 5 नोव्हेंबरला लष्कर कमांडर ख्वाजा शाहिदचे छिन्नविछिन्न शीर एलओसीजवळ सापडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com