Telegram Dainik Gomantak
ग्लोबल

Telegramने गाठला 1 अब्ज डाउनलोडरचा टप्पा

भारत Telegramसाठी सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे.

दैनिक गोमन्तक

टेलिग्राम (Telegram) या लेटेस्ट अ‍ॅपने जागतिक स्तरावर 1 अब्ज डाउनलोडरचा टप्पा पार केला आहे. हा डेटा सेन्सर टॉवरने शेअर केला. हे अ‍ॅप 2013 पासून युजर्ससाठी उपलब्ध आहे आणि त्याची मार्केटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि फेसबुक (Facebook) अ‍ॅपसोबत जोरदार स्पर्धा आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसी वादापासून हे अ‍ॅप अधिक प्रमाणात डाउनलोड करण्यात आले आणि जास्त चर्चेतही आले. टेलिग्रामच्या युजर्समध्येही बरीच वाढ झाली. सेन्सर टॉवरने सांगितले की, टेलिग्रामने शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी प्रथमच जगभरात 1 अब्ज डाउनलोडचा टप्पा पार केला आहे. या यादीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, स्पॉटिफाई आणि नेटफ्लिक्स अ‍ॅप्सचाही समावेश आहे. सेन्सर टॉवरने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत देश टेलीग्रामसाठी सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे.

सुमारे 22 टक्के लाइफटाइम इंस्टॉल भारतात आढळून आले आहे. भारतानंतर, रशिया आणि इंडोनेशिया या दोन प्रमुख बाजारपेठा टेलिग्राम अ‍ॅपसाठी उदयास येत आहेत. या देशातून टेलिग्रामला एकूण लाइफटाइम इंस्टॉल अनुक्रमे 10 टक्के आणि 8 टक्के मिळाले आहे. सेन्सर टॉवरच्या मते, टेलिग्रामने 2021 च्या पहिल्या सहामाहीत 214.7 दशलक्ष इंस्टॉल्स गाठले, जे 2020 च्या कालावधीत नोंदवलेल्या 133 दशलक्षांच्या तुलनेत 61 टक्के वार्षिक वाढ नोंदविण्यात आले आहे. सेन्सर टॉवरचा हा डेटा सर्वात आधी टेकक्रंचने नोंदवला होता. सेन्सर टॉवरने दिलेली ही आकडेवारी टेलिग्रामचा अ‍ॅक्टीव्ह युजर्स रिप्रेजेंट करत नाही. मात्र टेलीग्रामने गेल्या वर्षी सांगितले की कंपनीचे सुमारे 500 दशलक्ष युजर्स मंथली एक्टिव यूजर्स आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपबद्दलच्या वादामुळे टेलिग्रामला खूप फायदा झाला. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी धोरणामुळे लोक संतापले होते आणि त्याला विरोध करत होते. दरम्यान, लोकं मोठ्या संख्येने टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या अ‍ॅप्सकडे वळले होते. नंतर टेलिग्रामने लोकांना आकर्षित करण्यासाठी ग्रुप व्हिडीओ कॉल आणि उत्तम साउंड क्वॉलिटीसह स्क्रीन शेअरिंग सारखे अनेक फिचर्स देखील दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT