Khatera Hashmi Dainik Gomantak
ग्लोबल

'तालिबान्यांनी माझे अपहरण करुन, डोळे काढले'; अफगाण महिलेने मांडली करुन कहाणी

खटेरा हाश्मी (Khatera Hashmi) यांच्या मते, एका महिलेला घराबाहेर सोडणे हे तालिबानच्या दृष्टीने सर्वात मोठे पाप आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी (Taliban) आपली सत्ता स्थापण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे तालिबान अफगाण नागरिकांवर (Afghan Citizens) करत असलेल्या अत्याचाराच्या घटना प्रकर्षाने पुढे येत आहे. येणाऱ्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य कसे असेल, याची धास्ती अफगाण जनतेने घेतली आहे. 90 च्या दशकातील तालिबाने केलेल्या क्रूरतेची परिसीमा येणाऱ्या काळत तर होणार नाही याचीही भिती अफगाण नागरिकांकडू व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अफगाण महिला, नागरिक तालिबान्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुनही तालिबनावर मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची खबदारी घेण्याचे आंतरराष्ट्रीय समुदाय (International Community) देत आहे. यातच आता पुन्हा एकदा तालिबान्यांची क्रूरता समोर आली आहे. तालिबान्यांनी एका अफगाण महिला पोलिस कर्मचाऱ्यावर अत्याचार केले आहेत. अफगाणिस्तानच्या महिला पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या खतेरा हाशिमा यांनी सांगितले की, तालिबान अजिबात बदलला नाही, अगदी 20 वर्षांपूर्वी होता तसाच आहे. खरं तर, मी गर्भवती असताना तालिबान्यांनी माझे अपहरण करुन अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता डोक्यात अनेक वेळा गोळ्या झाडल्या गेल्या आणि डोळे काढले असल्य़ाची दर्दनाक कहानी त्यांनी यावेळी सांगितली.

दरम्यान, खटेरा हाश्मी (Khatera Hashmi) यांच्या मते, एका महिलेला घराबाहेर सोडणे हे तालिबानच्या दृष्टीने सर्वात मोठे पाप आहे. माध्यमाशी बोलताना खटेरा यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी कथन केली. खटेरा पुढे म्हणाल्या, त्यांच्यासोबत जे घडले ते आजही अफगाणिस्तानातील अनेक महिलांसोबत होत आहे. परंतु त्या महिलांची अशी करुन कहानी कधीच समोर येत नाही. त्याचबरोबर त्या हे सगळं कोणालाच सांगू शकत नाहीत. खाटेरा सध्या भारतात आहेत, परंतु या मुलाखतीदरम्यान त्यांनी अफगाणिस्तानात तालिबान्यांनकडून होत असलेल्या अत्याचाराची आठवण करून दिली. इस्लामच्या नावाखाली तालिबान अफगाण लोकांना धमकात आहे.

'जिवंत मृतदेहामध्ये बदलले होते'

खटेरा यांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर मी जिवंत मृतदेह बनली होती. मला काबूलमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे डॉक्टरांनी माझा जीव वाचवला. परंतु त्याच दरम्यान कायमची माझी दृष्टी कायमची गेली. खटेरा पुढे म्हणतात की, मी आज श्वास घेत आहे, पण माझ्यासाठी एक-एक दिवस घालवणे एका संघर्षापेक्षा कमी नाही. छोट्या छोट्या गोष्टी करणे सुद्धा माझ्यासाठी एक आव्हान बनले आहे.

तालिबान मुलांना धमकावतो

त्यानंतर खटेरा यांना पुढील उपचारासाठी भारतात आणण्यात आले. दुसरीकडे, अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली आहे. खटेरा यांचे कुटुंब अजूनही अफगाणिस्तानात आहे. हाशिमा यांनी सांगितले की, मला आपल्या मुलांची काळजी आहे, परंतु असे असूनही मी अफगाणिस्तानात परतण्यास असमर्थ आहे. कारण, तालिबानला कळले आहे की मी जिवंत आहे, आणि ते त्याला शोधत आहेत. हाशिमा यांनी पुढे सांगितले की मी माझ्या मुलांशी आठ-दहा दिवसांपूर्वी बोललो होते. तालिबान लढाखे अनेकदा आपल्या घरी येतात. दिवस असो की रात्र, ते येतात आणि दार ठोठावतात आणि विचारतात की माझे पती आणि मी कधी परत येणार ते. ते माझ्या मुलांना धमकी देतात की जर तुमचे पालक परत आले नाहीत तर आम्ही तुमच्याशी काहीही करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT