Taliban
Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban: पाकिस्तानी सैनिकाची तालिबानकडून निर्घृण हत्या, झाडावर टांगला मृतदेह

Pramod Yadav

युद्धविरामाची घोषण झाल्यानंतर देखील तेहरीक-ए-तालिबानचा (TTP)पाकिस्तानमध्ये प्रभाव दिसत आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा भागात टीटीपीने एका पाकिस्तानी सैनिकाची निर्घृणपणे हत्या करून, त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला आहे. तालिबानकडून घटनास्थळी एक धमकीचे पत्रही सोडले आहे. यामध्ये स्थानिक लोकांना या जवानाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहण्याची धमकी देण्यात आली आहे. अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी तालिबानने दिली आहे.

रहमान असे हत्या करण्यात आलेल्या जवानाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील सुहैब झुबेरी नावाच्या पत्रकाराने सोशल मीडियावर तालिबानच्या क्रूरतेची कहाणी शेअर केली आहे. या घटनेबाबत पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

अफगाणिस्तानच्या पत्रकाराने दिली हत्येची माहिती

अफगाण पत्रकार सुहैबच्या म्हणण्यानुसार, तालिबानी सैनिकांनी रहमानचा शिरच्छेद केला. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. मृतदेहाजवळ पश्तो भाषेत लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे. यामध्ये शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला कोणीही उपस्थित राहू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना बन्नू जिल्ह्यात घडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

SCROLL FOR NEXT