Taliban
Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban Writes To India: हवाई वाहतूक सुरु करण्यास तालिबानची भारताला विनंती

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अंतरिम तालिबान सरकार (Taliban Government) स्थापन झाल्यानंतर आता ते उर्वरित जगाशी आपले संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर जगभरातील देशांनी तेथून त्यांच्या विमान सेवा बंद केल्या होत्या. अशा परिस्थितीत, पहिल्यांदाच, तेथील सरकारकडून भारताला (India) औपचारिक पत्र लिहिले गेले आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान पुन्हा हवाई सेवा सुरु करण्याची विनंती करण्यात आली आहे. हे पत्र अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाच्या (Civil Aviation Authority of Afghanistan) वतीने भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला लिहिले आहे. हे पत्र अफगाणिस्तानचे कार्यवाहक हवाई वाहतूक मंत्री अलहाज हमीदुल्ला (Alhaj Hamidullah) यांच्या वतीने DCGA प्रमुख अरुण कुमार यांना लिहिले आहे. विशेष म्हणजे, तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलचा ताबा घेतल्यानंतर भारताने तेथून नियमित उड्डाणे बंद केली होती.

या पत्रात असे म्हटले आहे की, अलीकडेच अमेरिकन सैन्य मागे घेण्यापूर्वी काबूल विमानतळाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. कतारचे तांत्रिक सहाय्य हे विमानतळ पुन्हा सुरु करण्यात गुंतले असून 6 सप्टेंबर रोजी या संदर्भात त्यांच्याकडून एक NOTAM देखील जारी करण्यात आला आहे.

तालिबान सरकारच्या वतीने पुढे म्हटले होते की, या पत्राचा उद्देश दोन देशांमधील प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करणे आहे. त्यात म्हटले आहे - आमच्या राष्ट्रीय वाहक (एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअर) ने त्यांच्या नियोजित उड्डाणे चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाने विनंती करत म्हटले की, व्यावसायिक उड्डाणांच्या ऑपरेशनमध्ये मदत करा.

दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या (American troops) संपूर्ण माघारीनंतर तालिबानने ते आपल्या ताब्यात घेतले. भारताने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी काबुल येथून भारतीय हवाई दलाचे शेवटचे विमान चालवले होते. प्रथम त्यास दुशान्बेला नेण्यात आले आणि नंतर एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला आणण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT