Taliban worried about weapons black market in Afghanistan  Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानचा अफगाणिस्तान हत्यारांच्या ब्लॅक मार्केटवर अखेर पडदा

तालिबानला यापुढे काळ्या बाजारात विकल्या जाणार्‍या शस्त्रांची गरज नाही, परंतु हजारो असॉल्ट रायफल, मशीन गन, रॉकेट लाँचर, कार्बाइन, रॉकेट आणि काडतुसे यांच्यावर त्यांचे नियंत्रण आहे

दैनिक गोमन्तक

तालिबानची (Taliban) सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानात (Afghanistan) खुल्या शस्त्रांच्या विक्रीवर पडदा पडला आहे. काबूलच्या (Kabul) ताब्यादरम्यान तालिबानच्या हाती मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक अमेरिकन शस्त्रे आली आहेत. तालिबानला यापुढे काळ्या बाजारात विकल्या जाणार्‍या शस्त्रांची गरज नाही, परंतु हजारो असॉल्ट रायफल, मशीन गन, रॉकेट लाँचर, कार्बाइन, रॉकेट आणि काडतुसे यांच्यावर त्यांचे नियंत्रण आहे.काळ्या बाजारावरील ताबा सुटल्यास शस्त्रे दहशतवादी संघटना आयएस (Islamic State) किंवा अन्य विरोधी संघटनांच्या हाती लागतील, त्यानंतर त्यांचा वापर तालिबानविरोधात केला जाईल, अशी भीती तालिबानला आहे. तालिबानला या काळ्या बाजारावर आपली मक्तेदारी कायम ठेवायची आहे.(Taliban worried about weapons black market in Afghanistan)

यापूर्वी, अफगाणिस्तान पुनर्गठन प्रक्रियेचे विशेष महानिरीक्षक म्हणाले होते की, दोन दशकांच्या संघर्षादरम्यान, अमेरिकेने अफगाण सुरक्षा दलांना 80 अब्ज डॉलर (सुमारे 6 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीची लष्करी उपकरणे दिली होती.याशिवाय, गेल्या दोन वर्षांत अमेरिकेने अफगाण सुरक्षा दलांना 2.6 अब्ज डॉलर्स (19,511 कोटी रुपये) अत्याधुनिक शस्त्रे दिली आहेत. अफगाण सुरक्षा दलांना मिळालेली दोन लाख लहान शस्त्रे (असॉल्ट रायफल, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर) या मोजणीत समाविष्ट नाहीत, असे एका अहवालात म्हटले आहे. ही सर्व शस्त्रे आता तालिबानकडे आहेत.

रशियातून मदत सामग्री घेऊन अफगाणिस्तानची राजधानी काबुलला गेलेल्या तीन रशियन लष्करी विमानांपैकी एक मॉस्कोच्या चकालोव्स्की विमानतळावर परतले आहे. या विमानाने रशियन आणि किर्गिज नागरिक आणि अफगाण विद्यार्थी रशियात आले आहेत. हे अफगाण विद्यार्थी रशियन विद्यापीठात शिकत आहेत. विमानात एकूण 214 लोक काबूलहून आले आहेत.

तालिबानच्या अंतरिम सरकारची अपेक्षा आहे की अनेक देशांनी वर्षाच्या अखेरीस काबूलमध्ये त्यांचे दूतावास पुन्हा सुरू करावेत. तालिबानचे प्रवक्ते मुहम्मद नईम यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचे दूतावास उघडण्यासंदर्भात अनेक देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. तालिबानला काही देशांकडून सकारात्मक संकेत देखील मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

Chimbel Unity Mall: चिंबल 'युनिटी मॉल'चा फैसला 14 तारखेला! सत्र न्यायालयात 'जीटीडीसी' आणि याचिकाकर्त्यांमध्ये जोरदार युक्तिवाद

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

SCROLL FOR NEXT