Taliban will form an independent air force to fight ISIS Dainik Gomantak
ग्लोबल

ISIS चा सामना करण्यासाठी तालिबान तयार करणार स्वतंत्र हवाई दल

काबूलमधील एका उच्चपदस्थ तालिबानी गुप्तचर अधिकाऱ्याने हवाई दल असणे अत्यावश्यक असल्याचा आग्रह धरला

दैनिक गोमन्तक

तालिबाने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशात इस्लामिक स्टेटची (ISIS) दहशत वाढली आहे. अशा परिस्थितीत ISIS चा सामना करण्यासाठी तालिबानने स्वतःचे हवाई दल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. केन्यूजने एका वृत्तात ही माहिती दिली आहे. काबूलच्या मुख्य लष्करी रुग्णालय सरदार दाऊद खान यांच्यावर मंगळवारी संशयित ISIS-K ने हल्ला केला. यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. या हल्ल्यानंतर तालिबानने अमेरिकेच्या ब्लॅक हॉकसह तीन तालिबानी हेलिकॉप्टर रुग्णालयाच्या छतावर तैनात केले.

या हल्ल्यानंतर तालिबान सरकारमधील अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते कारी सईद खोस्ती यांनी केन्यूजशी बोलताना सांगितले की, "आम्ही आधीच्या सरकारच्या हवाई दलाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या व्यावसायिकांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच ते सर्व परत येतील यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहे. आमचे सर्वांसाठी चांगले धोरण आहे." असे असले तरी काबूलमधील एका उच्चपदस्थ तालिबानी गुप्तचर अधिकाऱ्याने हवाई दल असणे अत्यावश्यक असल्याचा आग्रह धरला अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

लवकरच वायूसेना तयार केली जाईल

"राज्य पूर्णपणे स्थापित झाल्यानंतर लवकरच एक पूर्ण वायूसेना तयार केली जाईल यात शंका नाही."अशी माहितीही सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते बिलाल करीमी म्हणाले, 'आम्ही हवाई दल तयार करत आहोत. विमानांची सोय करणाऱ्या वैमानिकांची माफी मागत आम्ही त्यांना परत यावे आणि पुन्हा सैन्यात भरती होऊन त्यांच्या देशाला मदत करण्यास सांगितले आहे.' संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वारिझमी यांनी सांगितले की, 'ज्या विमानांना किरकोळ दुरुस्तीची गरज आहे ते निश्चित करण्यात आले आहेत. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार तालिबानने अफगाण हवाई दलाकडून जप्त केलेली उपकरणे किती कार्यरत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ISIS मध्ये सामील झालेल्या माजी सैनिकांच्या अडचणी वाढल्या

अफगाणिस्तानच्या मागील सरकारच्या गुप्तचर सदस्य इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया खोरासान (ISIS-K) मध्ये सामील झाले . तालिबानशी लढण्यासाठी हे लोक इस्लामिक स्टेटचा भाग बनले आहेत. वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचा हवाला देत खामा प्रेसने सांगितले की, अफगाणिस्तानातील मागील सरकारच्या गुप्तचर संस्थेचे सदस्य आता तालिबानला टाळण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी ISIS-K मध्ये सामील होत असल्याची माहिती मिळत आहे.

वॉल स्ट्रीटच्या मते, पूर्वीचे सुरक्षा कर्मचारी बहुतेक अमेरिकेचे प्रशिक्षित अफगाण हेर होते, आता एक उत्तर अफगाणिस्तानात कार्यरत दहशतवादी गट यात सामील होत आहेत. तालिबानचा ताबा घेतल्यापासून त्याला विरोध करणारा नॉर्दर्न रेझिस्टन्स ग्रुप हा एकमेव गट होता. त्याचे नेतृत्व अहमद मसूद आणि पंजशीरमध्ये माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी केले. मात्र, पंजशीरही काही आठवड्यांनंतर तालिबानच्या ताब्यात आले.

त्यामुळे हे हेर आयएसमध्ये सामील

अहवालानुसार, सरकार पडल्यानंतर माजी अफगाण हेर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शिवाय, त्यांना तालिबानकडून सूडाची भीती वाटते आणि अतिरेकी संघटनेशी लढण्यासाठी सोडण्यात आले आहे. यामुळेच ते ISIS-K मध्ये सामील होत आहेत, जेणेकरून ते आपले उत्पन्न वाढवू शकतील आणि तालिबानशी लढू शकतील. अफगाणिस्तानमध्ये लक्ष्यित हत्या आणि बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नंगरहार प्रांत टार्गेट किलिंग आणि बॉम्बस्फोटांचा सामना करत आहे. यातील अनेक हल्ले इसिसने केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT